Mahadev Betting App : सौरभ चंद्रकारला दुबईहून अटक

125
Mahadev Betting App : सौरभ चंद्रकारला दुबईहून अटक
Mahadev Betting App : सौरभ चंद्रकारला दुबईहून अटक

महादेव बेटिंग ऍपचा प्रमोटर सौरभ चंद्रकार (Saourabh Chandrakar) याला दुबईहून अटक करण्यात आली. सक्तवसुली संचालनालयाने (ED) इंटरपोलला केलेल्या विनंतीनुसार सौरभच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली होती. त्यानुसार ईडी, परराष्ट्रीय मंत्रालय आणि गृहमंत्रालयाच्या समन्वयातून सौरभला अटक झाली आहे. (Mahadev Betting App)

याबाबत अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यूएई अधिकाऱ्यांनी काल परराष्ट्र मंत्रालयाशी अधिकृतपणे संवाद साधून सौरभ चंद्राकर (Saurabh Chandrakar arrested in Dubai) याला दुबईत अटक केल्याची माहिती दिली. सौरभच्या प्रत्यार्पण प्रक्रिया पुढील काही दिवसांत पूर्ण होईल आणि त्याला भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी यूएई प्राधिकरणाकडे विनंती केल्याचे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. महादेव बेटिंग ॲपच्या (Mahadev Betting App) मुख्य प्रमोटरपैकी एक असलेल्या सौरभ चंद्राकरला मनी लाँड्रिंग आणि फसवणूक प्रकरणात इंटरपोलने जारी केलेल्या अटक वॉरंटच्या आधारे दुबईत करण्यात आली आहे. आता लवकरच त्याला भारतात आणले जाण्याची शक्यता आहे. या ॲपचा आणखी एक प्रमोटर रवी उप्पल याला गेल्या वर्षीच्या अखेरीस दुबईत अटक करण्यात आली होती. त्यांच्याविरुद्ध रेड नोटीस जारी (Red Notice) करण्याची विनंती ईडीने केली होती. त्यानंतर त्याच्या मुसक्या आवळल्या होत्या. (Mahadev Betting App)

सौरभचे यूएईतील रास अल खैमाह येथे फेब्रुवारी 2023 मध्ये लग्न झाले होते. त्याने त्याच्या लग्नात सुमारे 200 कोटी रुपये खर्च केला होता. त्याने भारतातून नातेवाईकांना लग्न सोहळ्याला आणण्यासाठी खासगी जेट भाड्याने घेतले होते. तसेच लग्नात परफॉर्म करण्यासाठी त्याने सेलिब्रिटींसाठी मोठी रक्कम मोजली दिली होती, असा ईडीचा आरोप आहे. महादेव बेटिंग ॲप घोटाळा हा सुमारे 6 हजार कोटींचा आहे.

(हेही वाचा – Navaratri Durga Idol : काँग्रेसप्रणित राज्यात हिंदूंच्या धार्मिक प्रतिकांवर हल्ला, अज्ञातांकडून दुर्गामातेच्या मूर्तीची विटंबना)

महादेव ऑनलाइन बेटिंग घोटाळा (Online betting scam) हा छत्तीसगडमधील भिलाई येथील व्यक्तींचा समावेश असलेल्या आणि यूएई तसेच भारतातील विविध राज्यांमधून चालवल्या जाणाऱ्या बेकायदेशीर कारवायांचे एक जाळे आहे. छत्तीसगडमध्ये 2023 साली विविध ठिकाणी केलेल्या छामेमारीच्या कारवाईदरम्यान ईडीने या घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. ईडीच्या माहितीनुसार, महादेव ऑनलाइन बेटिंग ऍप (Online betting app) हा एक अनधिकृत प्लॅटफॉर्म होता. ज्या माध्यमातून क्रिकेट आणि फुटबॉलसह विविध खेळांवर तसेच जुगाराच्या इतर प्रकारांवर बेकायदेशीर बेटिंगचा व्यवहार चालत होता. संपूर्ण भारतामध्ये आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत असलेल्या या ऍपने झटपट पैसे कमविण्याचे आमिष दाखवून अनेकांना आकर्षिक केले होते.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.