महादेव ऑनलाईन बेटिंग अॅपचा (Mahadev Online Betting App Case) सहसंस्थापक रवी उप्पल याला संयुक्त अरब अमिराती (UAE)मध्ये ताब्यात घेण्यात आले. त्याला अटक केल्यानंतर भारतीय एजन्सी यूएई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. रवी उप्पला भारतात आणण्याची तयारी सुरू आहे.
अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED)विनंतीवरून इंटरपोलने रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटिस आधीच जारी केली होती. भारतीय एजन्सीच्या सूचनेवर कारवाई करत दुबईच्या स्थानिक पोलिसांनी रवी उप्पलला ताब्यात घेतले. यानंतर सौरभ चंद्राकरलाई लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या संदर्भातील माहितीही पोलिसांच्या हाती लागली आहे.
(हेही वाचा – Senate Election : उच्च न्यायालयात सिनेट वेळापत्रकाला आव्हान देणारी याचिका ; एक आठवड्याची दिली मुदत)
मनी लॉंड्रिंग प्रकरणातही चौकशी
बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित मनी लॉंड्रींग प्रकरणात रवी उप्पलची ईडीकडून चौकशी केली जात आहे. ऑक्टोबरमध्ये रायपूर येथील विशेष मनी लॉंड्रिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयात उप्पल आणि त्याचा भागीदार सौरभ चंद्राकर याच्या विरुद्ध मनी लॉंड्रींगचे आरोप पत्र दाखल करण्यात आले होते.
४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त
महादेव बेटिंग अॅपप्रकरणी ईडीने २ महिन्यांपूर्वी मुंबई, कोलकाता आणि भोपाळमधील ३९ ठिकाणी छापे टाकून ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. रवी उप्पल हा सौरभ चंद्राकरसोबत दुबईमध्ये राहात होता. काही महिन्यांपूर्वीच त्याला केंद्र सरकारने महादेव बेटिंग अॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला होता.
छत्तीसगडच्या माजी मुख्यमंत्र्यांवर आरोप
महादेव बेटिंग अॅप प्रकरणात छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. ७ आणि १७ नोव्हेंबर २०२३ रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महादेव अॅपच्या प्रवर्तकांकडून छत्तीसगडला लक्ष्य केले जात असल्याची २ नोव्हेंबरला ईडीला मिळाली होती.
हेही पहा –