प्रयागराजमध्ये (Prayagraj) महाकुंभमेळ्यात (Mahakumbh 2025) दुसऱ्या अमृत स्नानाच्या म्हणजेच मौनी अमावस्येच्या पूर्वी चेंगराचेंगरीची (Mahakumbh Stampede) घटना घडली आहे. रात्री 1 वाजताच्या सुमारास चेंगराचेंगरी झाल्याची माहिती आहे. या घटनेत 10 जणांचा मृत्यू तर, अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेमुळे आखाडा परिषदेनं मौनी अमावस्येनिमित्त होणारं अमृत स्नान रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आखाडा परिषदेचे अध्यक्ष रवींद्र पुरी (Ravindra Puri) यांनी दिली आहे. (Mahakumbh 2025)
#WATCH | Prayagraj, Uttar Pradesh: Rescue operations are underway after a stampede-like situation arose in Maha Kumbh and several people were reported injured. https://t.co/4z63F7pAS9 pic.twitter.com/YxZHXIoy51
— ANI (@ANI) January 29, 2025
“प्रयागराज येथील कुंभमेळ्यात चेंगराचेंगरी झाल्यानंतर मौनी अमावस्येनिमित्त होणाऱ्या अमृत स्नानाचा निर्णय रद्द केला आहे. आज कोणत्याही आखाड्याकडून अमृत स्नान होणार नाही. आखाड्यांनी त्यांच्या मिरवणुकांना शिबिरांना माघारी बोलावण्यात आलं आहे.” अशी माहिती महंत रवींद्र पुरी यांनी दिली. (Mahakumbh 2025)
नेमकं काय घडलं ?
जिथं लोक झोपली होती तिथं त्या ठिकाणी मागील बाजूनं लोक आले आणि त्यानंतर चेंगराचेंगरी झाली. त्याचवेळी लाखो लोक संगमाच्या तटावर स्नान करत होते. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका दाखल झाल्या आणि जखमींना बाहेर काढण्याचं काम सुरु करण्यात आलं. सर्व भाविकांना संगम घाटावर स्नान करायचं होतं. दुसऱ्या घाटावर स्नान करायला ते तयार नव्हते. त्यामुळं एका ठिकाणी गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरी झाली. यानंतर पळापळ झाली. मिळालेल्या माहितीनुसार 111 ते 122 पोल नंबरमध्ये चेंगराचेंगरी झाली. या घटनेतील जखमींना स्वरुप रानी नेहरु रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. (Mahakumbh 2025)
#WATCH | Prayagraj, UP | After a stampede took place at #MahaKumbh2025, Niranjani Akhara Chief Kailashanand Giri Maharaj says, “Seeing the large and indispensable crowds, Akhara Parishad and all the acharyas have decided that we will not do ‘snaan’ today. We need to keep the… pic.twitter.com/gGuUzc2iWg
— ANI (@ANI) January 29, 2025
चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर सातत्यानं जिथं चेंगराचेंगरी झाली आहे त्या संगम घाटावर कोणी जाऊ नये, असं आवाहन केलं आहे. संगम घाटावरुन लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. घटनेच्या साक्षीदारांनी दिलेल्या माहितीनुसार पोलीस लोकांना घाटावरुन बाजूला करत होते. त्यावेळी लोक जोरदार पळू लागले आणि स्थिती नियंत्रणाबाहेर गेली. प्राथमिक माहितीनुसार 50 ते 80 लोक जखमी झाल्याची माहिती आहे. मात्र, प्रशासनानं आकडेवारी जाहीर केलेली नाही. (Mahakumbh 2025)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community