Maharashtra Assembly Election 2024 : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भरारी पथकाची कारवाई; १७ लाख जप्त 

169
Maharashtra Assembly Election 2024 : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भरारी पथकाची कारवाई; १७ लाख जप्त 
Maharashtra Assembly Election 2024 : उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात भरारी पथकाची कारवाई; १७ लाख जप्त 

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra Assembly Election 2024) थोडेच दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच  निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी दिनांक २९ ऑक्टोबर रोजी शेवटची तारीख होती. त्यानंतर आता सर्वपक्षीय नेत्यांना प्रचाराचे वेध लागले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस दिवस शिल्लक राहिले आहेत. दरम्यान, विधानसभा निवडणूक पूर्ण होई पर्यंत राज्यात आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. उल्हासनगर विधानसभा (Ulhasnagar Vidhan Sabha) मतदार संघात भरारी पथकाने मध्यरात्री केलेल्या तपासणीत 17 लाख रुपयांची संशयास्पद रोकड जप्त केली. या रकमेच्या वैध पुराव्याअभावी निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेसाठी ही कारवाई महत्त्वाची ठरली आहे. (Maharashtra Assembly Election 2024)

मिळालेल्या माहितीनुसार 31 ऑक्टोबरच्या मध्यरात्री साधारण दोन वाजण्याच्या सुमारास भरारी पथकाला (Bharari squad) कल्याणकडून मुरबाडच्या दिशेने जात असलेले MH05 DZ9911 हे वाहन संशयास्पद वाटल्याने त्यास थांबविण्यात आले. वाहन थांबवून तपासणी केली असता, मोठी रोख रक्कम आढळली. आश्चर्य म्हणजे, वाहन चालकाकडे या रकमेसंदर्भात कोणताही वैध पुरावा नसल्याने ती रोख रक्कम त्वरित जप्त करण्यात आली.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : वर्षा गायकवाड विरोधातील बाँब अखेर फुटलाच)

तपासणीच्या वेळी आढळलेल्या रोख रकमेची मोजणी केल्यावर ती 17 लाख रुपये असल्याचे समोर आले. जप्त केलेली रक्कम कोषागारात जमा करण्यात आली असून, याबाबतचा तपास आयकर विभागाला (Income Tax Department) देण्यात आला आहे. आयकर विभागाच्या माध्यमातून या रकमेसंबंधी सखोल तपासणी सुरू आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.