बुलढाणा जिल्ह्यातील २७ वर्षीय महिला २ जानेवारीला घाटी रुग्णालयात दाखल झाली होती. सरकारी डॉक्टरांनी तिच्यावर उपचार सुरू केले असता तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे उघडकीस आले. त्यामुळे डॉक्टरांनी याची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलीस आणि आरोग्य विभाग यांनी गर्भपात करण्यात आलेल्या चित्तेहाव येथील रुग्णालयात छापेमारी केली. यावेळी डॉक्टर पत्नी-पती फरार झाले. यावेळी या पथकाला रुग्णालयात गर्भपात करणाऱ्या वस्तू आणि औषधे सापडली.
( हेही वाचा : सर्वोच्च न्यायालयाला मिळाले ५ नवे न्यायमूर्ती! )
अवैध गर्भपात केंद्र
औरंगाबादच्या चित्तेगाव येथील पांगरा रोडवर औरंगाबाद स्त्री रुग्णालय गेल्या ३ ते ४ वर्षांपासून सुरू होते. हे रुग्णालय जाधव दाम्पत्य चालवत होते. डॉ. अमोल जाधव आणि डॉ. सोनाली उद्धव काळकुंबे-जाधव या पती-पत्नीकडून रुग्णालयामध्ये अवैध गर्भपात करण्यात येत होते. सध्या हे दाम्पत्य फरार आहे.
आरोग्य विभागात खळबळ
कोणतीही डिग्री नसताना हे रुग्णालय कसे सुरू होते? याबाबत कोणालाही का माहिती मिळाली नाही? आरोग्य विभागाचे भरारी पथक काय करत होते? असे प्रश्न सध्या उपस्थित करण्यात येत आहेत. याप्रकरणी पुढील तपास बिडकीन पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक संतोष माने हे करत आहेत.
Join Our WhatsApp Community