महाराष्ट्र पोलिसांना नववर्षाची भेट! भत्त्यामध्ये हजार रुपयांची वाढ

महाराष्ट्र पोलिसांना सरकारकडून नववर्षाचे मोठे गिफ्ट मिळाले आहे. पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यामध्ये १ हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे. याआधी पोलिसांना वार्षिक ५ हजार रुपये गणवेश भत्ता देण्यात येत होता. यात आता वाढ करून पोलीस उपनिरीक्षक ते अपर पोलीस अधिक्षक या अधिकाऱ्यांना ६ हजार रुपये रुपये भत्ता मिळणार आहे.

( हेही वाचा : येशूचे रक्त प्या, पूजा करा म्हणत धर्मपरिवर्तन करण्याचा प्रयत्न; आळंदीत गुन्हा दाखल )

गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय

यासंदर्भात गृह विभागाने पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेश भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय जारी केला आहे. गणवेश भत्त्यामध्ये वाढ केली जावी अशी मागणी करण्यात येत होती. अखेर गृह विभागाने पोलिसांची ही मागणी मान्य करून भत्त्यामध्ये १ हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलीस वसाहतींच्या दुरूस्तीसाठी डीपीडीसीमधून निधी उपलब्ध करून देण्यात आला असून त्यानंतर आता गणवेश भत्त्याबाबत निर्णय देत शिंदे-फडणवीस सरकारने पोलिसांना दिलासा दिला आहे. याआधी गणवेश भत्ता देण्याऐवजी गणवेशाचे साहित्य दिले जात होते. परंतु या नियमात २०२१ मध्ये बदल करण्यात आला आणि अधिकाऱ्यांनी गणवेश भत्ता देण्याचा निर्णय गृह विभागाने घेतला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here