Hingoli येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; नाकाबंदीत १.४० कोटी रुपये जप्त 

353
Hingoli येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; नाकाबंदीत १.४० कोटी रुपये जप्त 
Hingoli येथे स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई ; नाकाबंदीत १.४० कोटी रुपये जप्त 

हिंगोली जिल्ह्यात (Hingoli) विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Elections 2024) अनुषंगाने वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. शहरातील बसस्थानक परिसरात शुक्रवारी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून वाहनांची तपासणी सुरू असताना दोन वाहनांत १ कोटी ४० लाख रूपयांची रोकड आढळून आली. (Hingoli)

या कारवाईमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ उडाली आहे. हिंगोली, वसमत व कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची लगबग सुरू आहे. तर निवडणूक काळात गैरप्रकार होऊ नयेत, यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल (Collector Abhinav Goyal), पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात ठिकठिकाणी वाहनांची तपासणी केली जात आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : वरळीतून मिलिंद देवरा यांना उमेदवारी ?)

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी बसस्थानक परिसरात एका इनोव्हा कारची तपासणी केली असता, त्यात १.२४ कोटी रुपये आढळून आले. याबाबत चालक अमित हेडा याची चौकशी केली असता, त्याला रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. तसेच शहरातील जुन्या नगरपालिका कार्यालयाजवळ दुसऱ्या इनोव्हा कारच्या तपासणीमध्ये १३.५० लाख रुपये आढळून आले. पोलिसांनी कारचे चालक गजानन काळे याच्याकडे चौकशी केली असता, त्यालाही रक्कम वाहतुकीचे समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यामुळे पोलिसांनी तातडीने एफएसटी पथकाचे नोडल अधिकारी अरविंद मुंडे, कर्मचारी बाळू बांगर, पंडीत मस्के, जे. बी. घुगे, व्ही. व्ही. चव्हाण यांच्या समक्ष रक्कम जप्त केली आहे. 

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.