महाराष्ट्र हिटलीस्टवर, घातपाताचा कट; दहशतवाद्यांची कबूली

आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह संघु उर्फ रिंदाच्या दहशतवादी माॅड्युलच्याआधारे महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याचा कट दहशतवादी गटाकडून रचण्यात आला होता, अशी खळबळजनक माहिती कल्याण येथील आंबिवली येथे पंजाब अॅन्टी गॅंगस्टर स्क्वाॅडने महाराष्ट्र एटीएससोबतच्या संयुक्त कारवाईत अटक केलेल्या तीन संशयित दहशतवाद्यांच्या कबुलीजबाबातून उघड झाली.

( हेही वाचा: पुण्यातून तब्बल 105 कोयते पोलिसांनी केले जप्त )

दहशतवाद्यांचा  खळबळजनक खुलासा

पंजाबचा कुख्यात गॅंगस्टर सोनू खत्री यूएसमध्ये आहे. तो बब्बर खालसा या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या, तसेच आंतरराष्ट्रीय दहशतवादी हरविंदर सिंह रिंदाचा साथीदार होता. नोव्हेंबर 2022 मध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोसमुळे रिंदाचा पाकिस्तानच्या लाहोर येथील मिलिटरी हाॅस्पिटलमध्ये मृत्यू झाल्याची माहिती मिळताच, सोनू खत्रीच्या इशा-यावर आपण महाराष्ट्रात मोठा घातपात करण्याच्या तयारीत होतो, पण हा घातपात केव्हा, कसा, कधी आणि कोणासाठी होणार,याची कल्पना मात्र आपणास नव्हती. या ऑपरेशनसाठी येत्या काही दिवसांत सूचना मिळणार होत्या, अशी माहिती शिवम अवतार महालो, गुरमुख नरेशकुमार सिंह उर्फ गोरा अमनदीप, कुमार गुरमेलचंद उर्फ रन्चो या तीन संशयितांनी तपास यंत्रणांना दिली आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here