छत्तीसगडमध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी चकमकीची (Naxalite encounter) बातमी समोर आली आहे, यामध्ये नक्षलग्रस्त भागात गोळीबार झाला आहे. शुक्रवारी विजापूरमध्ये (Bijapur) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत १२ नक्षलवादी ठार झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी घटनास्थळावरुन नक्षलवाद्यांचे मृतदेह आणि मोठ्या प्रमाणात शस्त्रे जप्त केली आहेत. (Chhattisgarh)
गेल्या काही दिवसांपासून छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाई सुरू आहे. छत्तीसगडमधील विजापूर, दंतवाडा आणि सुकामा या तीन जिल्ह्यात सुमारे या १२०० डीआरजी, एसटीएफ, कोब्रा आणि सीआरपीएफ जवानांचे ‘नक्षलविरोधी ऑपरेशन’वर (‘Anti-Naxal Operation’) सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सुरक्षा दलाच्या टीमला विजापूरच्या जंगलात नक्षलवादी लपल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संयुक्त कारवाई सुरू केली. (Chhattisgarh)
(हेही वाचा – Property Tax : मुंबईतील प्रत्येक मालमत्तांची होणार तपासणी, प्रत्यक्ष वापर आणि क्षेत्रफळानुसारच आकारला जाणार मालमत्ता कर!)
चकमक सकाळी ६ वाजेपासून सुरू
सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक पहाटे ६ वाजल्यापासून सुरू होती आणि अजूनही सुरू आहे. तीन जिल्ह्यांचे आयजी, डीआयजी आणि एसपी या चकमकीवर लक्ष ठेवून आहेत. पोलिसांनी अद्याप याबाबत कोणतीही माहिती दिलेली नसली तरी सूत्रांच्या माहितीनुसार, बिजापूर जिल्ह्यातील गंगलूर पोलीस स्टेशन परिसरातील पेडिया जंगलात सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये ही चकमक सुरू आहे.
(हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : उमेदवारांसाठी रात्र थोडी, सोंगे फार)
यावर्षी आतापर्यंत १०३ नक्षलवादी ठार
या परिसरात सर्च ऑपरेशन सुरू आहे. १६ एप्रिल रोजी राज्यातील कांकेर जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत २९ नक्षलवादी ठार झाले. ३० एप्रिल रोजी नारायणपूर आणि कांकेर जिल्ह्यांच्या सीमेवरील जंगलात सुरक्षा जवानांशी झालेल्या चकमकीत तीन महिलांसह १० नक्षलवादी ठार झाले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, या घटनेसह, नारायणपूर आणि कांकेरसह सात जिल्ह्यांचा समावेश असलेल्या राज्याच्या बस्तर प्रदेशात सुरक्षा दलांसोबत झालेल्या वेगळ्या चकमकीत यावर्षी आतापर्यंत १०३ नक्षलवादी ठार झाले आहेत. (Chhattisgarh)
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community