Malad Crime : आइस्क्रीम कोन मध्ये मानवी बोटाचा तुकडा, मालाड मध्ये खळबळ

689
Malad Crime : आइस्क्रीम कोन मध्ये मानवी बोटाचा तुकडा, मालाड मध्ये खळबळ
एका ऑनलाईन डिलिव्हरी ॲप वरून मागवलेल्या आइस्क्रीम कोन च्या आत मानवी बोट आढळून आल्याचा प्रकार पश्चिम उपनगरातील मालाड (Malad Crime) येथे घडली. हे बोट आइस्क्रीम कोन (Ice cream cone) मध्ये कसे आले व कुणाचे बोट आहे याचा तपास मालाड पोलिसांनी (Malad Police) सुरू केला आहे. (Malad Crime)
आइस्क्रीम कोन मध्ये आढळुन आलेल्या २ सेंटी मीटर लांबीच्या या बोटामुळे मालाडमधील (Malad Crime) २७ वर्षीय इसमाला धक्का बसला असून त्याने यापुढे आइस्क्रीम कधीच खाणार नसल्याचे म्हटले आहे. मालाड पश्चिम येथे राहणाऱ्या २७ वर्षीय ऑर्लेम ब्रेंडन सेराओ (Orlem Brendan Serrao) यांनी बुधवारी झेप्टो या डिलिव्हरी ॲप वरून आइस्क्रीम कोनची (Ice cream cone) ऑर्डर केली होती. यम्मो बटरस्कॉच (Yummy butterscotch) कोन त्याने खाण्यासाठी उघडले आणि त्याने कोन तोंडात टाकताच त्याच्या जिभेला वेगळे काही तरी जाणवले, त्याने कोन बाहेर काढून बघितले असता त्याला धक्काच बसला आइस्क्रीम कोनच्या आत चक्क मानवी बोट दिसून आल्याने त्याने प्रथम आपली बोटे तपासली,आपली बोटे साबूत आहे, हे कळल्यावर त्याने आइस्क्रीम बाजूला ठेवून गुळण्या करून तोंड धुतले, त्यानंतर त्याने झेप्टो ॲपवर तक्रार दाखल केली, आणि मालाड पोलीसांना कळवले. (Malad Crime)
एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, २ सेंटी मीटर चा बोटाचा तुकडा न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवला जाईल. ज्या ठिकाणी आइस्क्रीम बनवले जाते आणि पॅक केले जाते त्या ठिकाणाचाही शोध घेतला जाईल, हे प्रकरण ”आम्ही गांभीर्याने घेतले आहे. (Malad Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.