Malegaon Vote Jihad : ईडीच्या रडारवर आले अंगाडीया; सात ठिकाणी छापेमारी

99
Malegaon Vote Jihad : ईडीच्या रडारवर आले अंगाडीया; सात ठिकाणी छापेमारी
  • प्रतिनिधी

मालेगाव वोट जिहाद प्रकरणी शुक्रवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मुंबई आणि अहमदाबाद येथे ७ ठिकाणी छापेमारी केली. या छापेमारीत काही अंगाडीयाची नावे समोर आली आहे. मालेगावमधील मर्चंट को-ऑपरेटिव्ह (NAMCO) बँकेत कोट्यवधींचा आर्थिक व्यवहार झाला असून हे पैसे वोट जिहादसाठी वापरल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता. ही रक्कम अंगाडीया मार्फत वितरित करण्यात आल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. मुंबई आणि अहमदाबादमधील सात ठिकाणच्या छापेमारीत ईडीने १३.५ कोटींची रोकड जप्त केली आहे. (Malegaon Vote Jihad)

७ नोव्हेंबर रोजी, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव चावणी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यात मालेगाव येथील नमको बँकेत नव्याने उघडलेल्या १४ खात्यांमध्ये १०० कोटींहून अधिक रक्कम जमा केल्या प्रकरणी दोषींवर पहिली कारवाई केली गेली. सिराज अहमद मोहम्मद हारुण मेमन आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला होता. आरोपींनी गुन्ह्याची रक्कम जमा करण्यासाठी आणि हस्तांतरित करण्यासाठी विविध निरपराध व्यक्तींची ओळख दस्तऐवज वापरले. ईडीने नंतर मालेगाव पोलिसांच्या गुन्ह्याच्या आधारे मनी लाँड्रिंगचा गुन्हा नोंदवला. ईडीने केलेल्या तपासणीत अशीच पाच खाती बँक ऑफ महाराष्ट्र, नाशिक शाखेतही ठेवल्याचे समोर आले. नमको (NAMCO) बँकेत ठेवलेल्या १४ खात्यांमधून आणि बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये ठेवलेल्या पाच खात्यांमधून ऑनलाइन बँकिंगद्वारे केलेल्या डेबिट व्यवहारांच्या मनी ट्रेल तपासणीत दिसून आले असे ईडीच्या सूत्रांनी सांगितले. (Malegaon Vote Jihad)

(हेही वाचा – BMC : दादरच्या केशवसूत पुलाखालील सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम नियमबाह्य, मनसेने घेतला आक्षेप)

२१ खात्यांच्या बँक खाते विवरणांच्या विश्लेषणातून असे दिसून आले आहे की, या खात्यांमध्ये शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार मुख्यतः ऑनलाइन बँकिंग चॅनेलद्वारे जमा झाले होते. जे पुढे विविध कंपन्यांच्या खात्यांमध्ये हस्तांतरित केले गेले होते. या खात्यांच्या स्टेटमेंटच्या पुढील विश्लेषणात असे दिसून आले की, अशा संशयास्पद खात्यांमधून शेकडो कोटी रुपयांची रक्कम रोखीने काढण्यात आली. ईडीच्या तपासात असे समोर आले आहे की, नागानी शफी आणि वसीम वलीमोहम्मद भेसानिया या दोघांनी कथितपणे विविध डमी संस्थांच्या खात्यांमधून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम काढली आणि ती अहमदाबाद, मुंबई आणि सुरतमधील अंगडियांना (हवाला ऑपरेटर) वितरित केली. त्यांनी मेहमूद भागड उर्फ ​​’चॅलेंजर किंग’ उर्फ ​​’एमडी’ याच्या सूचनेनुसार काम केले होते. शफी आणि भेसानिया यांना ईडीने अटक केली आहे. यापूर्वी, ईडीने मुंबईतील सुमारे २५ परिसरांची झडती घेतली होती. (Malegaon Vote Jihad)

किरीट सोमय्या यांनी आरोप केलेल्या मालेगाव वोट जिहाद या घोटाळ्यात शुक्रवारी ईडीने पुन्हा एकदा मुंबई, अहमदाबाद येथील सात ठिकाणी छापे मारले. यात साडे तेरा कोटी रुपयांची कॅश जप्त करण्यात आली आहे. या छापेमारीत मुंबई आणि अहमदाबाद येथील अंगाडीयाची नावे समोर आली असून अंगाडीयाच्या मार्फत या रकमा वितरित करण्यात आल्याचे समजते. ईडीच्या रडारवर अनेक अंगाडीया कंपन्यांचे मालकांची नावे समोर आली असून लवकरच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. आतापर्यंत या प्रकरणातील मुख्य आरोपी सिराज मोहम्मदच्या खात्यात एक हजार कोटी रुपये जमा झाले. यात ५ आरोपींना अटक केली असून ७ आरोपी फरार आहेत. तसेच या घोटाळ्याचा पाठपुरावा करण्यासाठी भाजपा नेते किरीट सोमय्या हे पुन्हा एकदा सोमवारी मालेगावला जाणार असल्याचेही त्यांनी पत्रकारांना सांगितले. (Malegaon Vote Jihad)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.