Muslim : धर्मांध मुसलमान विमानात नमाज पढतो, विमान उडवून देण्याची धमकी देतो, मलेशियात मात्र तो गजाआड

'मलेशिया एअरलाईन्स'च्या MH-122 या विमानातील धक्कादायक प्रकार

170
Muslim : धर्मांध मुसलमान विमानात नमाज पढतो, विमान उडवून देण्याची धमकी देतो, मलेशियात मात्र तो गजाआड
Muslim : धर्मांध मुसलमान विमानात नमाज पढतो, विमान उडवून देण्याची धमकी देतो, मलेशियात मात्र तो गजाआड

‘मी अल्लाचा गुलाम आहे, बॉम्ब टाकून विमान उडवेन’, असे सांंगत इतर प्रवाशांना धमकवणा-या व्यक्तीचा व्हिडिओ समोर आला आहे. ‘मलेशिया एअरलाईन्स’च्या MH-122 या विमानात हा प्रकार घडला आहे. हे विमान सिडनीहून क्वॉलालम्पूर येथे जात होते. या वादग्रस्त व्यक्तीचे नाव मोहम्मद असल्याचे सांगितले जात आहे. आश्चर्याची बाब म्हणजे विमान हवेत उडत असताना ही व्यक्ती असे करत होती. त्याने केलेल्या या भयानक कृत्यामुळे विमानातील प्रवासी घाबरून गेले. या विमानात एकूण 194 प्रवासी होते. सर्व प्रवासी सुखरूप असल्याची माहिती मलेशिया एअरलाईन्सने दिली. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता विमान पुन्हा सिडनीला नेण्यात आले आणि इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेण्यात आला, असे विमान कंपनीने सांगितले आहे. अनेकवेळा धमक्या देत असताना या व्यक्तीने तिच्या बॅगेत हात घातल्याने लोक घाबरले. त्या व्यक्तीच्या या कृत्यानंतर ते विमान सिडनी विमानतळावर उतरवण्यात आले आणि पोलिसांनी आरोपी मोहम्मदला अटक केली. या व्यक्तीच्या दोन व्हिडिओवर लोकांनी अनेक प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

त्या व्यक्तीने ही धमकी दिल्यानंतर त्याची बॅग तपासण्यात आली, मात्र त्यात कोणतेही नुकसान करणाऱ्या वस्तू आढळल्या नाहीत. या व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. त्याच्याविरोधात खटला दाखल करण्याची तयारी करण्यात येत आहे. त्याचवेळी दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये ही व्यक्ती विमानात नमाज अदा करत असल्याचे दिसत आहे.

(हेही वाचा – Simcard : सरकारने ५२ लाख मोबाईल कनेक्शन केले बंद)

आतापर्यंत रस्त्यावर नमाज पढल्यामुळे वाहतुकीची गैरसोय होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. चालत्या रेल्वेमध्ये, गजबजलेल्या रेल्वे स्थानकावर नमाजपठण चालू असल्याच्याही घटना घडल्या आहेत. उडत्या विमानात नामजपठण करणे आणि ‘मी अल्लाचा गुलाम आहे. बॉम्ब टाकून विमान उडवेन’, असे सांगून दहशत निर्माण करणे, यातून जिहाद जागतिक स्तरावर फोफावला असल्याचे दिसून येत आहे. हा प्रकार ऑस्ट्रेलियासारख्या देशात घडला असल्याने या कृत्याची दखल घेतली जात आहे, तसेच त्यावर खटला चालवला जात आहे. असे अनेक प्रकार भारतात घडत असताना त्याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती दिसून येते.

हेही पहा – 

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.