राज्याचे DCM Eknath Shinde यांची गाडी बॉम्बने उडविण्याची धमकी देणारा बुलढाण्यातून ताब्यात

539
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांना जीवे मारण्याची ई मेल द्वारे धमकी देणाऱ्या एका संशयिताला मुंबई गुन्हे शाखेने बुलढाणा येथून ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली. शिंदे यांना जीवे मारण्याच्या धमकीचे ई मेल मुंबईतील अनेक पोलीस ठाणे आणि मंत्रालयात पाठविण्यात आले होते.या प्रकरणी गोरेगाव पोलिसांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (DCM Eknath Shinde) यांच्या गाडीला बॉम्बने उडवण्याची देणारे धमकीचा ई-मेल गुरुवारी सकाळी एकाच वेळी मुंबईतील गोरेगाव, जेजे मार्ग, एमआरए मार्गसह काही पोलीस ठाणी आणि मंत्रालयात आला होता. धमकीचा ईमेल करणारा हा निनावी नावाने आला होता. ईमेलद्वारे आलेल्या धमकीने संपूर्ण राज्यात खळबळ उडवुन दिली होती. या धमकीचा ई मेलनंतर मुंबई पोलिसांची संपूर्ण यंत्रणा कामाला लागली होती, गुन्हे शाखेने तसेच सायबर सेलने या ई मेलचा ‘आय पी अड्रेस’ चा शोध सुरू केला होता.
दरम्यान मुंबईत अनेक ठिकाणी आलेल्या या धमकीच्या ईमेल प्रकरणी कुठे गुन्हा दाखल करायचा म्हणून वरिष्ठ पोलीस अधिकारी यांच्यात चर्चा सुरू होती. अखेर गुरुवारी सायंकाळी उशिरा गोरेगाव पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम ३५१(३),(४),३५३(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या दरम्यान मुंबई गुन्हे शाखेने ज्या आयपी अड्रेस वरून धमकीचा ई मेल पाठविण्यात आला त्याचा पत्ता शोधून काढला असता हा पत्ता बुलढाणा येथील असल्याचे समोर आले.
गुन्हे शाखा कक्ष १२ आणि इतर पथकाने बुलढाणा येथून गुरुवारी रात्री मंगेश वायाळ नावाच्या संशयिताला ताब्यात घेऊन त्याचा मोबाईल मधील ई मेल तपासले असता त्यात धमकीचे पाठवलेले ई मेल आढळुन आले, मात्र मी ई मेल केला नसल्याचे संशयितांचे म्हणणे आहे. गुन्हे शाखेचे संशयिताला घेऊन मुंबईकडे रवाना झाली आहे.मंगेश वायाळ या संशयिताबाबत अधिक माहिती मिळू शकलेली नाही.(DCM Eknath Shinde)

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.