दहशतवादी कट: रिक्षामधून कुकर बाॅम्ब घेऊन जाताना अचानक झाला स्फोट; आरोपी अटकेत

सौजन्य: एबीपी माझा

कर्नाटकमधील मंगळुरुमध्ये एका ऑटो रिक्षामध्ये ब्लास्ट झाला. याचा व्हिडीओ आता समोर आला आहे. 19 नोव्हेंबरला घडलेल्या या घटनेत कुकर बाॅम्ब होता. या बाॅम्बचा स्फोट झाल्याने रिक्षाचालकासह प्रवासीही जखमी झाले. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमींमध्ये रिक्षाचालक आणि प्रवासी आरोपीचा समावेश आहे. पोलिसांकडून या दुर्घटनेचा तपास सुरु आहे. ही घटना दहशतवादी कट असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

कर्नाटकातील मंगळुरु येथे शनिवारी झालेल्या ऑटो स्फोटाच्या घटनेचा दहशतवादी अॅंगल समोर आला आहे. ऑटोमध्ये प्रवास करणा-या प्रवाशाने बॅगेत कुकर बाॅम्ब ठेवला होता आणि त्याचा स्फोट झाला. कर्नाटकचे पोलीस महासंचालक यांनी या प्रकरणात सांगितले की, मंगळुरुमधील ऑटोमध्ये झालेला स्फोट हा अपघात असून दहशतवादी घटना आहे. कर्नाटक पोलीस केंद्रीय यंत्रणांसोबत मिळून या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

अतिरिक्त पोलीस महासंचालकांनी सांगितले की, याप्रकरणी दहशतवाद्याला मदत केल्याच्या आरोपात कर्नाटकात दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. मुख्य आरोपीने अन्य ठिकाणी स्फोट घडवण्याची योजना आखली होती, मात्र चुकून नागुरी येथे स्फोट झाला. याप्रकरणी पुढील तपास सुरु आहे.

( हेही वाचा: पुण्यात भीषण अपघात! तब्बल 47 गाड्या एकमेकांवर आदळल्या, 60 जण गंभीर जखमी )

संशयित आरोपी रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्री बोम्मई यांनी सांगितले की, संशयित आरोपीच्या घराची झडती घेतली असता, घटनास्थळावरुन जप्त केलेल्या आधारकार्डमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींची नावे आहेत. संशयिताकडे डुप्लिकेट आधारकार्ड होते. त्यात हुबळीचा पत्ता होता. या प्रकरणाच्या कर्नाटक पोलिसांसोबत तपासात एनआयए आणि आयबीचे अधिकारीही मिळून तपास करत आहेत. संशयित आरोपी ब्लास्टमध्ये जखमी झाल्यामुळे सध्या रुग्णालयात आहे. तो शुद्धीवर आल्यानंतर पुढील तापस केला जाईल.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here