मुंबई महानगर पालिकेच्या अधिकारी यांना मारहाण केल्याप्रकरणी वाकोला पोलिसांनी शिवसेना नेते (ठाकरे गट) अनिल परब सह पाच जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारहाण करणे आणि धमकी दिल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी रात्री उशिरा सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम या चार जणांना अटक करण्यात आली आहे.
(हेही वाचा – दर्शना पवार हत्याकांड : आधी कटरने वार आणि मग… ; आरोपी राहुलने केला हत्येचा खुलासा)
अटक करण्यात आलेल्या चौघांना आज म्हणजेच मंगळवार २७ जून रोजी वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
शिवसेना (ठाकरे गट) नेते अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी (२६ जून) सांताक्रूझ पूर्व येथील महानगर पालिकेच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. या दरम्यान अनिल परब, माजी नगरसेवक सदा परब सह पाच जण सहाय्यक मनपा आयुक्त यांच्या कार्यालयात आले व त्यांनी शिवसेना शाखा कोणी तोडली, बाळासाहेब ठाकरे यांच्या फोटोवर हातोडा कोणी मारला असा जाब विचारत सहाय्यक अभियंता अजय पाटील यांना मारहाण करण्यात आली तसेच सरकारी कामात अडथळा निर्माण करून अजय पाटील यांना धमकी देण्यात आली होती.
याप्रकरणी वाकोला पोलीस ठाण्यात मनपा विभाग कार्यकारी अभियंता केशव धोत्रे यांची तक्रार दाखल केली आहे, वाकोला पोलिसांनी याप्रकरणी सरकारी कामात अडथळा निर्माण करून मारहाण करणे, धमकी दिल्या प्रकरणी अनिल परब सह पाच जनावर गुन्हा दाखल करून रात्री उशिरा सदा परब, हाजी अलीम, उदय दळवी आणि संतोष कदम या चार जणांना अटक करण्यात आली आहे. याचौघांना आज वांद्रे न्यायालयात हजर करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community