Manipur Violence : मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

मणिपूरमधील संघर्षाच्या सुरुवातीपासूनची ही चौथी घटना आहे, ज्यात रजेवर असलेल्या किंवा कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये आसाम रेजिमेंटचे माजी सैनिक सेर्टो थांगथांग कोम यांचे खोऱ्यातून अज्ञात सशस्त्र समुहाने अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ते मणिपूरमधील लिमाखॉन्ग येथील डिफेन्स सर्व्हिस कॉर्प्स मध्ये तैनात होते.

169
Manipur Violence : मणिपूरमध्ये लष्करी अधिकाऱ्याचे अपहरण

मणिपूरमध्ये (Manipur Violence) एका लष्करी अधिकाऱ्याचे आज म्हणजेच शुक्रवार ८ मार्च रोजी त्यांच्या घरातून अपहरण झाले आहे. अधिकाऱ्याचे घरातून अपहरण झाल्याची राज्यातील ही चौथी घटना आहे. मणिपूरच्या थौबल जिल्ह्यात भारतीय लष्कराच्या एका कनिष्ठ आयुक्त अधिकाऱ्याचे (जेसीओ) त्यांच्या घरातून अपहरण करण्यात आले.

(हेही वाचा – Veer Savarkar : वीर सावरकर आणि महामानव भागोजीशेठ कीर यांच्या पुतळ्याचे सावरकर स्मारकात अनावरण )

सर्व सुरक्षा यंत्रणांकडून संयुक्तरित्या शोध मोहीम सुरू :

यासंदर्भातील माहितीनुसार सैन्य अधिकारी कोनसम खेडा सिंह हे चारंगपत मामंग लिकई येथील रहिवासी (Manipur Violence) आहेत. ते रजेवर असताना सकाळी ९ वाजता काही अज्ञात लोक त्यांच्या घरात घुसले आणि त्यांचे अपहरण केले. कोनसम खेडा सिंह यांना कारमधून घेऊन गेले. अपहरणाचे कारण अद्याप समजले नसले तरी, प्राथमिक तपासात हे खंडणीचे प्रकरण असण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. कारण त्यांच्या कुटुंबाला यापूर्वीही अशा धमक्या आल्या होत्या. दरम्यान, अपहरणाची माहिती मिळाल्यानंतर जेसीओच्या सुटकेसाठी सर्व सुरक्षा यंत्रणांनी संयुक्तरित्या शोध मोहीम सुरू केली. राष्ट्रीय महामार्ग १०२ वरून जाणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी सुरू आहे. (Manipur Violence)

(हेही वाचा – PM Narendra Modi : नवमतदारांमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे पंतप्रधान मोदींनी केले आवाहन)

अपहरणाची चौथी घटना :

मणिपूरमधील (Manipur Violence) संघर्षाच्या सुरुवातीपासूनची ही चौथी घटना आहे, ज्यात रजेवर असलेल्या किंवा कर्तव्यावर असलेल्या सैनिकांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना लक्ष्य करण्यात आले आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये आसाम रेजिमेंटचे माजी सैनिक सेर्टो थांगथांग कोम यांचे खोऱ्यातून अज्ञात सशस्त्र समुहाने अपहरण करून त्यांची हत्या केली होती. ते मणिपूरमधील (Manipur Violence) लिमाखॉन्ग येथील डिफेन्स सर्व्हिस कॉर्प्स (DSC) मध्ये तैनात होते.

(हेही वाचा – या ३ ड्रिंक्स प्या आणि सांधेदुखी विसरून जा)

अज्ञात सशस्त्र समुहाकडून अपहरण आणि हत्या :

या घटनेच्या २ महिन्यांनंतर अज्ञात सशस्त्र समुहाने ४ लोकांचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. एका कारमधून चुराचंदपूरच्या पहाडी जिल्ह्यातून लिमाखोंगला जात असताना त्यांची हत्या करण्यात आली होती. हे चौघेही जम्मू-काश्मीरमध्ये कार्यरत असलेल्या भारतीय लष्करातील जवानाच्या कुटुंबातील सदस्य होते. याचबरोबर, मणिपूर पोलिसांच्या अतिरिक्त पोलिस अधीक्षकांवर (एएसपी) २७ फेब्रुवारी रोजी इम्फाल शहरातील त्यांच्या घरी हल्ला झाला होता. या प्रकरणातील हल्लेखोरांची ओळख अरमबाई तेंगगोल (एटी) अशी झाली. हा एक कट्टरपंथी मैतेई समूह आहे. (Manipur Violence)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.