25 नोव्हेंबर रोजी मणिपूरच्या (Manipur Violence) लिमाखोंग कॅम्पमधून बेपत्ता झालेल्या 56 वर्षीय लैशराम कमलबाबू सिंहचा (Laishram Kamalbabu Singh) 2000 लष्कर आणि पोलिस संयुक्तपणे शोध घेत आहेत. मणिपूर पोलिसांनी सोमवारी फेसबुक पोस्टमध्ये सांगितले की, लैशरामचा शोध घेण्यासाठी मणिपूर पोलिस (Manipur Police) हेलिकॉप्टर, ड्रोन आणि श्वानपथकाची मदत घेत आहेत. त्यासाठी तंत्रज्ञानाचीही मदत घेतली जात आहे. (Manipur Violence)
कोण आहेत लैशराम कमलबाबू सिंह ?
इम्फाळ (Imphal) पश्चिम जिल्ह्यात ५७ व्या माऊंटन डिव्हिजनच्या लामाखॉन्ग मिलिटरी स्टेशनमध्ये मिलिटरी इंजिनिअरिंग सर्व्हिसेससोबत (एमइएस) लैशराम कमलबाबू सिंह एका कंत्राटदारासाठी सुपरवायझर म्हणून काम करत होते. मुख्यमंत्री एन. बीरेन सिंह यांनी सांगितले की, लष्कराच्या छावणीतून लैशराम बेपत्ता झाले असून त्यांना शोधण्याची जबाबदारी लष्कराने स्वीकारली पाहिजे. (Manipur Violence)
हेही वाचा- Weather Update: मुंबईत पावसाच्या हलक्या सरी; IMD ने दिला कोल्हापूरसह ‘या’ जिल्ह्यांना यलो अलर्ट
लैशराम २५ नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाले होते. पोलिसांच्या सहकार्याने लष्कराने शोध सुरू केला आहे. ते बेपत्ता झाल्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी संयुक्त कृती समिती स्थापन केली आहे. या समितीचे सदस्य लष्करी छावणीपासून अडीच किमी दूर असलेल्या कांटो सबल येथे उपोषणाला बसले आहेत. त्यात लैशराम यांच्या पत्नी अकोडजाम बेलारानी याही सहभागी झाल्या. (Manipur Violence)
हेही वाचा- Rabi Crops : ढगाळ हवामानाचा कांद्यासह रब्बी पिकांना फटका
कांगपोकपी जिल्ह्यामध्ये ही लष्करी छावणी असून गेल्या वर्षी मे मध्ये उसळलेल्या संघर्षात या भागातील मैतेइ (Meitei) समुदायाच्या लोकांनी पलायन केले होते. दहशतवाद्यांनी लैशराम यांचे अपहरण केले असावे, असा त्यांच्या कुटुंबीयांचा आरोप आहे. (Manipur Violence)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community