Mankhurd Crime : सावत्र पित्याकडून अडीच वर्षाच्या चिमुरडीची हत्या; मानखुर्दमधील घटना

276
Mumbai Crime : मुंबईत ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या; बिहारमधून अपहरणकर्त्याला अटक
Mumbai Crime : मुंबईत ९ वर्षाच्या मुलाचे अपहरण करून हत्या; बिहारमधून अपहरणकर्त्याला अटक
पत्नीच्या पहिल्या पतीपासून असलेल्या अडीज वर्षाच्या मुलीची सावत्र पित्याने हत्या केल्याची धक्कादायक घटना मुंबई पूर्व उपनगरातील मानखुर्द येथे घडली.मुलीची आई ही घरकाम करण्यासाठी गेल्याने मुलीचा सांभाळ करण्याची जवाबदारी त्याच्यावर आल्यामुळे त्याने हे कृत्य केल्याची कबुली अटक आरोपीने पोलिसांकडे दिली.या प्रकरणी मानखुर्द पोलिसांनी सावत्र पित्याला अटक करून त्याच्याविरुद्ध पोक्सो आणि हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. (Mankhurd Crime)
मानखुर्द मधील एका झोपडपट्टीत हे दाम्पत्य राहण्यास होते,बळीत मुलीच्या आईचा पहिला विवाह झाला असून पहिल्या पतीपासून  मुलगी  झाली होती. काही तरी कारणास्तव तक्रारदार महिलेने अटक आरोपी सोबत दुसरा विवाह केला होता. आरोपी हा टेम्पो चालक असून हे दाम्पत्य अडीज वर्षाच्या मुलीसोबत मानखुर्द मधील झोपडपट्टीत राहत होते.
आरोपी हा काही कामधंदा करीत नसल्यामुळे  बळीत मुलीची आई घरकाम करण्यासाठी जात होती, त्यामुळे मुलीला सांभाळण्याची सर्व जवाबदारी आरोपीवर आली होती. (Mankhurd Crime)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर रोजी रात्री बळीत मुलीची आई  कामावरून  घरी आली असता, मुलीला बेशुद्ध अवस्थेत बघून मुलीला काय झाले म्हणून पतीला विचारले असता ती खेळता खेळता पडली असे उत्तर आरोपीने दिले, बळीत मुलीच्या आईने तात्काळ तीला शताब्दी रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी तीला तपासून मृत घोषित केले, मुलीचे शरीर संपूर्ण मारहाणीने काळेनिळे पडले होते, तसेच तिच्या लघवीच्या जागेवर देखील जखमा आढळुन आल्याने डॉक्टरांनी पोलिसांना कळवले. (Mankhurd Crime)
मानखुर्द पोलिसांनी रुग्णालयात धाव घेऊन मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठविण्यात आला, दरम्यान पोलिसांनी बळीत मुलीच्या आईचा जबाब नोंदवून हत्येचा तसेच पोक्सो कायदा अंतर्गत  गुन्हा दाखल करून संशयित आरोपी म्हणून  सावत्र पित्याला अटक करण्यात आली. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने प्रथम हत्येची कबुली न देता ती खेळताना पडून जखमी झाली अशी माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने अखेर तीचा सांभाळ करावा2 लागत असल्यामुळे  रागाच्या भरात तीला लाटण्याने ,हाताने मारहाण केल्याची कबुली दिली. (Mankhurd Crime)
हेही पहा- 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.