मुळशी तालुक्यातील धडवली गावातील शेतकऱ्यांना धमकवण्यासाठी जाताना वापररलेली मनोरमा खेडकरांची (Manorama Khedkar) कार आता पोलिसांनी जप्त केली आहे. दरम्यान, आयएएस पूजा खेडकरवर क्राइम ब्रॅन्चने गुन्हा दाखल केल्यानंतर पूजा खेडकरचे दिल्लीच्या दिशेने उड्डाण केले असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु दिल्ली क्राईम ब्रांचकडे पूजा खेडकरच्या दिल्लीवारीची कोणतीही माहिती नाही.
(हेही वाचा –UPSCचे अध्यक्ष Manoj Soni यांचा कार्यकाळ संपण्याआधीच राजीनामा!)
प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी हातात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकवतानाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर याप्रकरणी मनोरमा खेडकर यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, त्यांच्या घरातून आता टोयोटा कार पोलिसांनी जप्त केली आहे. (Manorama Khedkar)
(हेही वाचा –Rain Update : विदर्भात मुसळधार पाऊस! नागपूरमध्ये शाळांना सुट्टी जाहीर)
वादग्रस्त प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांव्या आई मनोरमा खेडकर यांनी जमिनीच्या वादातून मुळशी तालुक्यातील शेतकऱ्यांना पिस्तूलाचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यावेळी त्यांनी ज्या टोयोटा कारचा उपयोग केला होता, ती कार पोलिसांनी जप्त केली आहे. पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला अखेर गुरुवारी सकाळी महाड येथून ताब्यात घेण्यात आलं. पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेसह पौड पोलिसांनी ही कारवाई केली. मनोरमा हिला पौड पोलिस ठाण्यात आणून अटक केली. (Manorama Khedkar)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community