Marol Murder Case: हत्या केल्यानंतर तो आईच्या कबरी जवळ बसून होता

196
Marol Murder Case: हत्या केल्यानंतर तो आईच्या कबरी जवळ बसून होता
Marol Murder Case: हत्या केल्यानंतर तो आईच्या कबरी जवळ बसून होता
अठरा वर्षीय प्रेयसीची गळा आवळून हत्या केल्यानंतर त्याने थेट कब्रस्तान गाठले, आईच्या कबरीजवळ बसून तो अश्रू गाळत होता. वडिलांनी त्याला कबरी जवळून उठवून पोलिसांच्या ताब्यात दिले. मुंबईतील अंधेरी पूर्व चिमटपाडा परिसरात सोमवारी ही घटना उघडकीस आली आहे. सहार पोलिसांनी (Sahara Police Station) या तरुणाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Marol Murder Case)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी झैबा ख्वाजा सोलकर (Zaiba Khawaja Solkar) नावाच्या २२ वर्षीय तरुणाने त्याची १८ वर्षीय मैत्रिण सारा सय्यद (Sarah Syed) हिचा मुंबईतील मरोळ नाका येथील अशोक टॉवर येथील फ्लॅटमध्ये रविवारी सायंकाळी गळा दाबून हत्या केली. शनिवारी रात्री साराचे वडील आणि १४ वर्षाचा भाऊ घरातील हॉलमध्ये झोपले होते आणि सारा ही बेडरूममध्ये अभ्यास करत होती. शनिवारी रात्री झैबा सोलकर हा प्रेयसीला भेटायला मागच्या दाराने आत आला, व त्याने बेडरूममध्ये जाऊन बेडरूमचे दार बंद केले. दोघांनी काही वेळ गप्पा मारल्या त्यानंतर झैबा आणि सारा यांच्यात भांडण झाले. या भांडणातून झैबाने साराच्या दुपट्टा घेऊन तिच्या गळ्याभोवती आवळून तीची हत्या केली. त्यानंतर त्याने हलक्या पावलाने तेथून पळ काढला. असे सहार पोलीस ठाण्याच्या (Sahar Police Station) पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. (Marol Murder Case)
दुसऱ्या दिवशी सकाळी सारा सय्यदच्या कुटुंबीयांनी तिला बेशुद्ध अवस्थेत बघून तातडीने रुग्णालयात नेले. तेथे पोहोचल्यावर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलिसांनी सांगितले की, साराची हत्या केल्यानंतर झैबा सोलकर हा मागील दाराने बाहेर पडला आणि त्याने अंधेरी (पूर्व) येथील चिमणपाडा (Chimanpada, Andheri East) परिसरातून उंदीर मारण्याचे विष विकत घेतले आणि त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु, विष पिण्याचे धाडस तो करू शकला नाही. त्यानंतर झैबा हा स्मशानात गेला आणि आईच्या कबरी जवळ जावून अश्रू गाळू लागला. त्याचे वडील त्याचा माग काढत स्मशानात आले, तेव्हा झैबा हा आईच्या कबरी जवळ बसून रडत होता. वडिलांनी त्याला विचारले असता त्याने वडिलांना त्याच्या हातून झालेल्या गुन्ह्याची कबुली दिली. (Marol Murder Case)

…आणि वाडिलांनीच दिले मुलाला पोलिसांच्या ताब्यात 

वडील त्याला घेऊन थेट सहार पोलीस ठाण्यात पोहचले आणि त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. झैबा सोलकर आणि मयत तरुणी गेल्या तीन वर्षांपासून एकमेकांना ओळखतात. रविवारी पहाटे तिची हत्या करण्यापूर्वी तीन दिवसांपूर्वी त्यांच्यात सोशल मीडियावर शाब्दिक भांडणही झाले होते. असे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी सहार पोलिसांनी या तरुणाविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. (Marol Murder Case)
हेही पाहा – 
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.