Matka Gambling : ‘हिंदुस्थान पोस्ट’चा दणका; कुर्ल्यातील मटका जुगारावर पोलिसांची कारवाई 

127
कुर्ला पश्चिम (Kurla West) येथील शाळेजवळ मटका जुगार सुरू असल्याची बातमी ‘हिंदुस्थान पोस्ट’ मध्ये छापून आल्यानंतर कुर्ला पोलिसांनी बातमीची दखल घेऊन मंगळवारी सायंकाळी येथील मटक्याच्या अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले. त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कायदा १८८७ कलम १२ (अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Matka Gambling)

कुर्ला पश्चिम बस स्थानक ठिकाणी असलेल्या नशेमन हॉटेल (Nasheman Hotel) जवळ मटका जुगाराचा अड्डा (Matka gambling den) चालविण्यात येत होता, या मटका अड्ड्यापासून हाकेच्या अंतरावर महानगर पालिकेची आणि इंग्रजी माध्यमाची शाळा असून शाळेत येताना जाताना विद्यार्थी आणि पालकांना त्याचा त्रास सहन करावा लागत असे, दरम्यान पालकांच्या तक्रारीनंतर ‘हिंदुस्थान पोस्ट’ने खात्री करून मंगळवारी ‘कुर्ल्यात शाळेपासून हाकेच्या अंतरावर मटका जुगाराचा अड्डे, पालकांची कारवाईची मागणी’ या मथळ्याखाली बातमी प्रसिद्ध केली होती.

(हेही वाचा – Pramod Mahajan Art Park ला बनवले बकाल; आयुक्तांना स्वत: भेट देऊन द्यावे लागले निर्देश)

कुर्ला पोलीस ठाण्याने या बातमीची दखल घेऊन वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तोरडमल (Senior PI Pramod Tordamal) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने मंगळवारी सायंकाळी कुर्ला पश्चिम नशेमन हॉटेलच्या शेजारी सुरू असलेल्या मटका जुगाराच्या (Matka Gambling) अड्ड्यावर छापा टाकून पाच जणांना ताब्यात घेतले, या छाप्यात पोलिसांना मटका जुगारच्या पावत्या आणि रोख रक्कम ५,६९० रुपये मिळून आले. या प्रकरणी कुर्ला पोलिस ठाण्यात (Kurla Police Station) मटका जुगाराचा अड्डा चालवणारा सलीम उर्फ पॅटिस पिडाराव (Salim alias Pattis Pidarao) सह पाच जणांविरुद्ध महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम, कायदा १८८७ कलम १२ (अ)नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ताब्यात घेण्यात आलेल्या पाच ही जणांना नोटीस देऊन सोडण्यात आले आहे.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.