संकल्प नशामुक्ती अभियान अंतर्गत लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी 31 डिसेंबर रोजी दोन ठिकाणी MD ड्रग्स पकडले आहे. पोलीस पथकाने जीवाची पर्वा न करता त्यास सिनेस्टाईल पद्धतीने ताब्यात घेतले. त्याची झाडाझडती घेतली असता त्याच्याकडे 30 ग्रॅम वजनाचा 90,000/- किंमतीचा विक्रीसाठी आणलेला एमडी हा अंमलीपदार्थ (Drugs) व त्याची पॅकिंग व विक्री करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पॅकींगच्या प्लास्टिकच्या पिशव्या असा एकूण सुमारे 1,30,000 रू/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
40 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज जप्त
रात्री 20.55 वा सत्यसाई कार्तीक यांनी पथकासह नायगाव परिसरात सापळा रचत रोशन चंद्रकांत ओव्हाळ, अमीत भरत भानुसघरे हे दुचाकीवरून एमडी हा अंमलीपदार्थ (Drugs) विक्री करण्यासाठी आलेले असताना त्या दोघांना शिताफीने ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता दोघांकडे प्रत्येकी 5 ग्रॅम असा एकूण 30,000 रू किंमतीचा 10 ग्रॅम एमडी अंमली पदार्थ मिळून आला आहे. या दोन कारवायांमध्ये 1,20,000 रू किंमतीचा 40 ग्रॅम वजनाचा एमडी ड्रग्ज व एकूण 2,00,000 रू किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला आहे.
(हेही वाचा Cryptocurrency : देशभरात ६६०६ कोटींचा बिटकॉईन घोटाळा, नितीन गौरला ईडीने केली अटक)
नशामुक्ती अभियानांतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या
सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरात अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका सुरूच ठेवली आहे. मावळ परिसरातील ड्रग्जचा (Drugs) वाढता विळखा रोखण्यासाठी व तरुणाईला नशेच्या आहारी जाण्यापासून परावृत्त करण्यासाठी तसेच परिसर ड्रग्जमुक्त करण्यासाठी कार्तिक यांनी संकल्प नशामुक्ती अभियान हाती घेतले आहे. जनजागृती करून झाल्यानंतर आता त्याचाच एक भाग म्हणून सत्यसाई कार्तिक यांनी मावळ परिसरातील अंमली पदार्थ विकणाऱ्या गुन्हेगारांविरोधात संकल्प नशामुक्ती अभियानांतर्गत कठोर कारवाया हाती घेतल्या आहेत. सत्यसाई कार्तीक यांना गुप्त बातमीदारामार्फत अशी बातमी मिळाली होती की, कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे ताजे व नायगाव परिसरात काही इसम हे मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर एमडी या अंमली पदार्थाची अतिशय छुप्या पद्धतीने विक्री करत असून त्यामुळे परिसरातील तरुणाई ड्रग्जच्या विळख्यात अडकत चालली आहे.
Join Our WhatsApp Community