-
ऋजुता लुकतुके
भारतातील हिरे व्यापारी आणि पंजाब नॅशनल बँकेत २ अब्ज अमेरिकन डॉलरचा घोटाळा घडवून आणल्याचा आरोप मेहुल चोक्सीला अखेर भारताच्या सांगण्यावरून बेल्डियममध्ये अटक करण्यात आली आहे. केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न २०१८ पासून सुरू होते. अखेर या प्रकरणातील पहिला टप्पा आता पूर्ण झाला आहे. बेल्जियमने त्याला ताब्यात घेतलं आहे. भारताला त्याचा ताबा मिळाला तर पंजाब नॅशनल बँकेत (Punjab National Bank) झालेल्या १३,००० कोटी रुपयांच्या गैरव्यवहारांची चौकशी त्याच्याकडे करता येणार आहे. सुरुवातीला मेहुल चोक्सी विरोधात इंटरपोलकडून रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात आली होती. ती रद्द झाल्यावर सक्तवसुली संचलनालयय आणि सीबीआय (CBI) यांनी त्याच्या प्रत्यार्पणाची प्रक्रिया सुरू केली होती. (Mehul Choksi Arrested)
लेटर ऑफ इंटरटेकिंग ही एक प्रक्रिया आहे. त्या द्वारे मालाची भारतात आयात करणारे व्यावसायिक आपण व्यवहार पूर्ण झाल्यावर तुम्हाला पैसे पर करु या बोलीवर बँकांकडून आधीच पैसे उचलतात. अगदी सरकारकडेही जीएसटी (GST) कर नंतर भरण्यासाठी अशाप्रकारचं पत्र लिहून देण्यात येतं. ही नियमित प्रक्रिया आहे. पण, चोक्सी आणि मोदी जोडीने या प्रक्रियेचा वापर पैसे लुटण्यासाठी केला. उचललेले पैसे त्यांनी बँकेला परत केले नाहीत. आणि त्याची नोंदही दडपली.
(हेही वाचा – Pakistan Super League : पाकिस्तान लीगमध्ये षटकार तसंच प्रत्येक बळीसाठी मिळणार १ लाख रुपये)
चोक्सी, त्याचा भाचा नीरव मोदी (Nirav Modi) आणि गीतांजली जेम्स या त्यांच्या कंपनीतील आणखी काही भागिदार व अधिकारी मिळून पंजाब नॅशनल बँकेकडून (Punjab National Bank) खोटी लेटर्स ऑफ अंडरटेकिंग (LOU) तसंच फॉरेन लेटर्स ऑफ क्रेडिट (FLC) तयार करून घेत होते. यात अर्थातच, बँकेचे अधिकारीही सहभागी होते. यातून बँकेला कोट्यवधीचं नुकसान झालं. अशा चुकीच्या पद्धतीने उचललेले पैसे चोक्सी आणि नीरव मोदी (Nirav Modi) स्वत:कडे ठेवून घेत होते. कंपनीच्या नावावर उचललेली रक्कम हडप करून कंपनीचंही दिवाळं माजवत होते.
पीसीबी बँकेच्या ब्रॅडी हाऊस इथल्या शाखेत हा गैरव्यवहार झाला आहे. गीतांजली जेम्स आणि चोक्सी, मोदी यांनी स्थापन केलेल्या इतर कंपन्यांचीही चौकशी ईडी तसंच सीबीआयकडून सुरू आहे. त्या प्रकरणी, या यंत्रणांना मेहुल चोक्सी आणि नीरव मोदीचा (Nirav Modi) ताबा हवा आहे. २०१८ मध्ये हा घोटाळा उघडकीला आल्या आल्या मेहुल चोक्सी आणि नीरव मोदी (Nirav Modi) भारतातून पळून गेले होते. त्यानंतर काही दिवसांनी मोदी लंडनमध्ये दिसला होता. तिथल्या न्यायालयात त्याच्या विरोधातही भारत सरकारने प्रत्यार्पण खटला सुरू केला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community