पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) घोटाळ्यातील मुख्य आरोपी आणि फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीला (Mehul Choksi Arrested) बेल्जियममध्ये अटक करण्यात आली आहे. भारतीय सुरक्षा एजन्सींच्या विनंतीवरून चोक्सीला अटक करण्यात आली आहे. केंद्रीय अन्वेषण ब्युरो (सीबीआय) ने बेल्जियममधील सरकारकडे विनंती केली होती. त्यानंतर ६५ वर्षीय मेहुल चोक्सी याला शनिवारी अटक करण्यात आली होती. तो आता तुरुंगात आहे. (Mehul Choksi Arrested)
काय घडलं ?
मेहुल चोक्सीला अटक करताना बेल्जियम पोलिसांनी मुंबई न्यायालयाने त्याच्याविरुद्ध जारी केलेल्या दोन अटक वॉरंटचा हवाला दिला. याबाबत इकोनॉमिक टाईम्सने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे की, मुंबई न्यायालयाने वॉरंट २३ मे २०१८ आणि १५ जून २०२१ रोजी जारी करण्यात आले होते. (Mehul Choksi Arrested)
मेहुल चोक्सी याने पंजाब नॅशनल बँकेकडून १३,५०० कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा केला होता. अटकेपासून वाचण्यासाठी तो भारतातून बेल्जियममध्ये फरार झाला होता. तो तेथे त्याची पत्नी प्रीती चोक्सीसोबत अँटवर्पमध्ये राहत होता. प्रीती चोक्सीकडे बेल्जियमचे नागरिकत्व आहे. चोक्सीकडे बेल्जियममध्ये ‘एफ रेसिडेन्सी कार्ड’ आहे. (Mehul Choksi Arrested)
काय आहे प्रकरण
पीएनबीमधून १३,८५० कोटी रुपयांची फसवणूक प्रकरणात मेहुल चोक्सीवर सीबीआय आणि ईडीकडून खटला दाखल केला आहे. या प्रकरणात चोक्सीचा पुतण्या नीरव मोदीसुद्धा आरोपी आहे. तो लंडनमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. त्याचे प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे. मेहुल चोक्सी जानेवारी २०१८ मध्ये त्याचा पुतण्या नीरव मोदीसह भारतातून पळून गेला होता. पंजाब नॅशनल बँकेतील कर्ज घोटाळ्याचे प्रकरण उघडकीस येण्यापूर्वीच हे दोघेही देश सोडून गेले होते. हा भारतातील दुसरा सर्वात मोठा बँक घोटाळा होता. (Mehul Choksi Arrested)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community