Drugs in Pune : पुणेही अमली पदार्थाच्या विळख्यात, महसूल गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई

५० कोटी रुपयांचे ‘मेथाक्युलोन’ अमली पदार्थ जप्त

160
Drugs in Pune : पुणेही अमली पदार्थाच्या विळख्यात, महसूल गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई
Drugs in Pune : पुणेही अमली पदार्थाच्या विळख्यात, महसूल गुप्तचर यंत्रणेची मोठी कारवाई

महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) पथकाने पुणे परिसरात मोठी कारवाई केली आहे. येथून ५० कोटी रुपयांचा १०१ किलो मेथाक्युलोन हा अमली पदार्थ (Drugs in Pune) जप्त करण्यात आला आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमली पदार्थ जप्त करण्यात आल्याने स्थानिकांमध्ये खळबळ उडाली आहे. महसूल गुप्तचर यंत्रणेच्या पथकाने या प्रकरणी तेलंगणा, महाराष्ट्र, दिल्ली आणि हरियाणा येथील रहिवासी असलेल्या 5 जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी बेकायदा विक्री, खरेदी, वाहतूक आणि निर्यातीत गुंतलेले असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले आहे. अमली पदार्थ विरोधी कायद्यातील (एनडीपीएस कायदा १९८५) तरतुदीनुसार ही कारवाई करण्यात आली.

(हेही वाचा – ISSF World Championships : 50 मीटर पिस्तुल प्रकारात भारताला सांघिक सुवर्ण)

डीआरआयच्या प्रादेशिक युनिटने 22 ऑगस्ट रोजी पुण्यात तेलंगणा येथील नंबर प्लेट असलेली गाडी अडवली. या वाहनात पांढरे स्फटिकाचे साहित्य असलेले ४ निळ्या रंगाचे प्लास्टिकचे ड्रम आढळून आले. याची प्राथमिक चाचणी केली असता हे मेथाक्युलोन असल्याचे समोर आले. मेथाक्युलोन अमली पदार्थ विक्रीचे जाळे देशातील अनेक राज्यांमध्ये पसरलेले असल्याची शक्यता असून, त्याअनुषंगाने तपास करण्यात येत आहे. या संदर्भात फॉरेन्सिक तपासणी केली जात असल्याचे डीआरआयच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे

युवकांना अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकवण्याचे षडयंत्र असल्याची चिंता

मेथाक्युलोनचा वापर हा झोपेसाठी आणि संमोहनासाठी केला जातो. पुणे शहरात आठवड्याभरात तिसऱ्यांदा अमली पदार्थांचा साठा जप्त झाला आहे. यापूर्वी एक कोटीचा साठा पुणे पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला होता. या प्रकरणात राजस्थानमधील सुमेर जयरामजी बिष्णोई, चावंडसिंग मानसिंग राजपूत, लोकेंद्रसिंह महेंद्रसिंग राजपूत या तीन जणांना अटक झाली होती. तीन ऑगस्ट रोजी 1 कोटी रुपयांचे अफिम जप्त केले गेले होते. त्यावेळी राजस्थानमधील राहुलकुमार भुरालालजी साहु याला अटक झाली होती. यामुळे पुण्यातील ड्रग्सचे राजस्थान मॉड्यूल समोर आले.

अमली पदार्थ सापडण्याची घटना वारंवार घडत असल्याने या प्रकरणी सखोल अन्वेषण करण्यात यावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. पुणे हे विद्येचे माहेरघर असल्याने येथे युवा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. अनेक शिक्षणसंस्था आहेत. अशा स्थितीत तिस-यांदा सापडलेला हा अमली पदार्थाचा (Drugs in Pune) मोठा साठा युवकांना अमली पदार्थाच्या जाळ्यात अडकवण्याचे षडयंत्र नाही ना, याविषयी चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.