ग्रेटर नोएडा येथे अकरावीत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने ‘जय श्रीराम’चा नारा दिल्याने अल्पवयीन मुलाला शिक्षकाने मारहाण केल्याची घटना राजधानी दिल्लीत घडली. ग्रेटर नोएडा येथील एका महाविद्यालयात पीटी शिक्षकांनी आपल्या अल्पवयीन मुलाला मारहाण केल्याची तक्रार विद्यार्थ्याच्या पालकांनी मुख्यमंत्री पोर्टलवर केली आहे. अल्पवयीन मुलाच्या वडिलांनी आरोप केला आहे की, ”आमच्या मुलाने जय श्रीरामच्या घोषणा दिल्याने पीटी शिक्षकांनी मारहाण केली. एवढेच नाही, तर आम्ही जेव्हा संचालकांकडे दाद मागायला गेलो, तेव्हा त्यांनी ‘तुमच्या मुलाचे नाव महाविद्यालयातून काढून टाकू’, अशी धमकीही आम्हाला दिली, असाही आरोप सदर मुलाच्या पालकांनी केला.
(हेही वाचा – DRDO Former Director : डीआरडीओचे माजी महासंचालक डॉ. अरुणाचलम यांचे निधन)
शाळेत स्वातंत्र्य दिवसाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी ११ वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याने जय श्रीरामच्या घोषणा दिल्या. त्यानंतर शिक्षकांनी वर्गात येऊन त्या विद्याथ्याचे नाव विचारले आणि त्याला १५ मिनिटे बेदम मारहाण केली. या मुलाचे काका त्याला घ्यायला आले होते. त्या वेळी त्याला मारहाण झालेली पाहून त्यांनी कारण विचारल्यानंतर या मुलाने सगळी माहिती दिली.
विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनीही शाळेची शिस्त मोडली
या संपूर्ण घटनेविषयी शाळा प्रशासनानेही भाष्य केले आहे. हे आरोप निराधार आहेत, असे शाळा प्रशासानाने म्हटले आहे. त्या दिवशीच्या सगळ्या घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाल्या आहेत. शाळेची शिस्त विद्यार्थी आणि शिक्षक या दोघांनीही मोडली आहे. मात्र आम्ही अद्याप मुलाला शाळेतून काढलेले नाही. जे शिक्षक या प्रकरणात आहेत, त्यांनी या विद्यार्थ्याला शिकवण्यास नकार दिला आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community