Minority Scholarship Scam : बनावट मदरसे आणि विद्यार्थी दाखवून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

2007-2008 ते 2022 पर्यंत सरकारची 22000 कोटी रुपयांची फसवणूक

164
Minority Scholarship Scam : बनावट मदरसे आणि विद्यार्थी दाखवून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
Minority Scholarship Scam : बनावट मदरसे आणि विद्यार्थी दाखवून सरकारची कोट्यवधी रुपयांची फसवणूक

अल्पसंख्यांक मंत्रालयातील शिष्यवृत्ती घोटाळा समोर आला आहे. मदरसा आणि अल्पसंख्याक संस्थांमध्ये शिकणाऱ्या मुलांना सरकारकडून शिष्यवृत्ती दिली जाते.ही रक्कम लाटण्यासाठी बनावट मदरसे आणि बनावट संस्था दाखवून शासनाची मोठी फसवणूक करण्यात आली आहे. 2007-2008 ते 2022 पर्यंत या घोटाळ्यात सरकारची 22000 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे.

या प्रकरणी अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने 21 राज्यांमधील 1572 अल्पसंख्याक संस्थांची तपासणी केली. यातील 830 संस्था केवळ कागदावरच सुरू होत्या. तपासणीत 53 टक्के संस्था बनावट किंवा गैर-ऑपरेटिव्ह असल्याचे समोर आले आहे. मंत्रालयाने त्याची तपासणी NCAER कडून केली. गेल्या 5 वर्षात केवळ बोगस संस्थांच्या नावे 144.83 कोटी रुपये काढण्यात आले. यामधील 830 बनावट संस्थांची खाती गोठवण्यात आली आहेत. एका मोबाईल क्रमांकावर 22 मुलांची नोंदणी करण्यात आल्याचे तपासादरम्यान समोर आले. अल्पसंख्याक मंत्रालयाने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला आहे.

(हेही वाचा – Mumbai Government Hospital: मुंबईतील सार्वजनिक रुग्णालयात दररोज ५१ रुग्णांचा मृत्यू)

अल्पसंख्यांक असल्याची सहानुभूती मिळवून अशी केली फसवणूक !
  • गेल्या 4 वर्षात केरळमधील मल्लपुरम या एकाच जिल्ह्यात 8 लाख मुलांना शिष्यवृत्ती मिळाली.
  • आसाममधील नागाव येथील बँकेच्या शाखेत एकाच वेळी 66000 शिष्यवृत्ती खाती उघडण्यात आली.
  • काश्मीरच्या अनंतनाग पदवी महाविद्यालयाची विद्यार्थीक्षमता 5 हजार असताना दाखवून 7 हजार विद्यार्थी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती घेऊन फसवणूक केली जात आहे.
  • 1.32 लाख मुले वसतिगृहांशिवाय राहत असल्याचे आढळून आले, परंतु ते वसतिगृहांसाठी शिष्यवृत्तीचे पैसे घेत होते.
  • उर्वरित 1 लाख 79 हजार 500 अल्पसंख्याक संस्थांची चौकशी अद्याप सुरू आहे.

देशातील 12 लाख बँक शाखांमधील प्रत्येक शाखेतील 5000 हून अधिक मुलांकडे शिष्यवृत्तीचे पैसे जात होते. गेल्या 4 वर्षांपासून अल्पसंख्याक मंत्रालयाकडून दरवर्षी 2239 कोटी रुपयांची शिष्यवृत्ती दिली जात होती. 2016 मध्ये अल्पसंख्याक मुलांच्या शिष्यवृत्तीचे डिजिटायझेशन झाल्यानंतर ही फसवणूक समोर आली. देशात 1,75,000 मदरसे आहेत, त्यापैकी केवळ 27,000 मदरसे नोंदणीकृत आहेत, जे शिष्यवृत्तीसाठी पात्र आहेत. अल्पसंख्याक समाजातील विद्यार्थ्यांना पहिली ते पीएच.डी.पर्यंत शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्तीची रक्कम 4000 ते 25000 पर्यंत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.