Mumbai Police : ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रम मुंबई पोलीस दलात राबविण्यात येणार

117
नवे दूरच, Police Patil यांचे जुने मानधनही प्रलंबित

नागरिकांची सेवा करण्याची प्रेरणा निर्माण व्हावी तसेच पोलिसांची कार्यक्षमता, कौशल्य वाढविण्यासाठी ‘मिशन कर्मयोगी’ (Mission Karma Yogi) हा उपक्रम मुंबई पोलीस दलात राबविण्यासाठी राज्याच्या गृहविभागाने मंजुरी दिली आहे. नागरी सेवा देणाऱ्या सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी राबविण्यात येणारा हा उपक्रम राज्यात प्रथम मुंबई पोलीस दलात प्रायोगिक तत्वावर राबविण्यात येणार आहे. (Mumbai Police)

‘मिशन कर्मयोगी’ म्हणजे काय?

मिशन कर्मयोगी योजनेचा (Mission Karma Yogi) मुख्य उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या क्षमतांचा विकास करणे हा आहे. यासाठी सरकारकडून अनेक सुधारणा करण्यात येणार आहेत. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले जाणार असल्याने ई-लर्निंग सामग्री दिली जाईल. या योजनेच्या माध्यमातून सरकारी कर्मचाऱ्यांची काम करण्याची क्षमता वाढवण्यात येणार आहे. (Mumbai Police)

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रशिक्षणाची रचना आणि अंमलबजावणीबाबतचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी सरकारला सादर केला होता. केंद्र सरकारच्या क्षमता निर्माण आयोगाच्या (सीबीसी) अंतर्गत मिशन कर्मयोगी, सर्व सरकारी अधिकाऱ्यांना जागतिक दर्जाच्या क्षमता वाढीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मिशन कर्मयोगी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे. प्रायोगिक तत्वावर मुंबई पोलीस दलाच्या ट्रेनिंग सेंटरचे ५५० पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना ५ दिवसांचे ‘मिशन कर्मयोगी’ उपक्रमाचे प्रशिक्षण देण्यात येईल. (Mumbai Police)

(हेही वाचा – Buldhana Accident : भरधाव ट्रकने रस्त्यावरील मजुरांना चिरडले; तिघांचा मृत्यू)

त्यानंतर मिशन कर्मयोगी प्रशिक्षण (Mission Karma Yogi) पूर्ण करणारे ५५० प्रशिक्षित अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून मुंबई पोलीस दलातील ४५ हजार पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांना मिशन कर्मयोगी उपक्रमाचे प्रशिक्षण देतील. हे प्रशिक्षण टप्प्याटप्प्याने पूर्ण करण्यात येणार आहे. तथापि, प्रशिक्षण देण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या योग्य संस्थांच्या निवडीसाठी सीबीसीने तयार केलेल्या रिक्वेस्ट फॉर प्रपोजलचा (आरएफपी) अभ्यास केल्यानंतर, प्रशिक्षण संस्थेची निवड आणि प्रशिक्षण कार्यक्रमाची अंमलबजावणी पोलिस आयुक्त, मुंबई यांच्यामार्फत अधिकृत केली जाईल,” असे एका अधिकारी यांनी सांगितले. या उपक्रमासाठी राज्याच्या गृह विभागाने मान्यता दिली असून लवकरच हा उपक्रम मुंबई पोलीस दलात राबविला जाणार आहे. केंद्र शासनच्या काही सरकारी विभागामध्ये हा मिशन कर्मयोगी हा उपक्रम राबविला गेला असून “या उपक्रमामुळे सरकारी नोकरांमध्ये सकारात्मक बदल दिसून आला आहे. (Mumbai Police)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.