Mithi River Silt Scam : तीन कंत्राटदारांची एसआयटीकडून चौकशी

66
Mithi River Silt Scam : तीन कंत्राटदारांची एसआयटीकडून चौकशी
  • प्रतिनिधी 

मिठी नदी गाळ काढण्याच्या कथित घोटाळ्याप्रकरणी गठीत करण्यात आलेल्या विशेष तपास पथकाकडून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कथित घोटाळा प्रकरणात एसआयटीने तीन कंत्राटदारांची चौकशी करून त्यांचा जबाब नोंदविला आहे. मुंबई उपनगरातील मिठी नदीचे रुंदीकरण आणि गाळ काढण्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचे भाजपाचे आमदार प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकर यांनी ऑगस्ट २०२४ मध्ये प्रश्न उपस्थित केला होता. राज्य विधान परिषदेत या कथित घोटाळ्याची चौकशीसाठी विशेष तपास पथक तयार करून या कथित घोटाळ्याचा तपास करण्यात येईल अशी घोषणा करण्यात आली होती. (Mithi River Silt Scam)

मागील आठवड्यात या कथित घोटाळ्याचा प्राथमिक तपास मुंबई पोलीसांच्या आर्थिक गुन्हे शाखेकडे सोपविण्यात आला होता. आर्थिक गुन्हे शाखेने मिठी नदी गाळ घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथक गठीत करण्यात आले असून प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. मिठी नदीतील गाळ काढण्याचा घोटाळा २००५ ते २०२१ या कालावधीत झाला असून मिठी नदीतून गाळ काढण्यावर झालेल्या सुमारे १,१०० कोटी रुपयांच्या खर्चाची विशेष पथकाकडून करण्यात येत आहे. मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या (EOW) विशेष तपास पथकाने (SIT) १,१०० कोटी रुपयांच्या कथित मिठी नदी गाळ काढण्याच्या घोटाळ्याप्रकरणी प्राथमिक चौकशीला वेग आला आहे. गाळ काढण्याचे कंत्राट देण्यात आलेल्या तीन कंत्राटदारांना चौकशीकामी बोलविण्यात आले होते. (Mithi River Silt Scam)

(हेही वाचा – छत्रपती शिवाजी महाराजांना अभिप्रेत असलेले सुराज्य निर्माण करण्यासाठी राज्य शासन कटीबद्ध; DCM Eknath Shinde यांचे प्रतिपादन)

मिठी नदीच्या गाळ काढण्याच्या कामात घोटाळ्याच्या आरोपांबद्दल विशेष पथकाने ऋषभ जैन, मनीष कसालीवाला आणि शेरसिंग राठोड या कंत्राटदारांना बोलावून चौकशी केल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. मिठी नदीच्या ११.८४ किलोमीटरच्या गाळ काढण्याचे काम मनपाच्या अखत्यारीत आहे तर उर्वरित ६.८ किलोमीटरचा भाग मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (एमएमआरडीए) अखत्यारीत आहे. “आम्ही मुंबई मनपा आणि एमएमआरडीएकडून कंत्राटाची कागदपत्रे आणि गाळ काढण्याच्या कामाचे तपशील मागवले होते. काही दिवसांपूर्वी आम्हाला दोन्ही एजन्सींकडून काही कागदपत्रे मिळाली आहेत. त्यांच्याआधारे, आम्ही या प्रकरणात चौकशी सुरू केली आणि तीन कंत्राटदारांची चौकशी केली,” असे एका आर्थिक दंडाधिकाऱ्याने सांगितले. (Mithi River Silt Scam)

एकूण १८ कंत्राटदारांची चौकशी केली जाईल, अधिकाऱ्याने सांगितले की, “गाळ काढण्याचे कंत्राट देताना योग्य निकषांचे पालन झाले का याची आम्ही चौकशी करत आहोत. मनपा आणि एमएमआरडीएच्या कंत्राट देण्याच्या प्रक्रिया वेगवेगळ्या आहेत. गाळ काढण्याचे काम प्रत्यक्षात झाले का, की ते फक्त कागदावरच होते याची आम्ही चौकशी करू. जर ते केले असेल, तर गाळ काढण्याचा कचरा कुठे टाकण्यात आला, गाळ वाहून नेण्यासाठी कोणत्या वाहनांचा वापर करण्यात आला इत्यादी बाबींची चौकशी केली जाईल. चौकशीत काही अनियमितता आढळल्यास गुन्हा दाखल करण्यात येईल, “अधिकाऱ्याच्या मते, चौकशीदरम्यान काही “धक्कादायक खुलासे” झाले आहेत आणि लवकरच कथित अनियमिततेत सहभागी असल्याचा संशय असलेल्या आणखी लोकांना चौकशिसाठी बोलविण्यात येईल असे एका अधिकारी यांनी सांगितले. (Mithi River Silt Scam)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.