Mithi River रुंदीकरण खोलीकरण घोटाळा: आर्थिक गुन्हे शाखेची एसआयटी करणार तपास

109

मिठी नदी रुंदीकरण (Mithi River Widening) आणि गाळ काढण्यामध्ये भ्रष्टाचार (Mithi River Corruption) झाल्याचा आरोपानंतर या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबई पोलिसांच्या (Mumbai Police) आर्थिक गुन्हे शाखेचे विशेष तपास पथक गठीत करण्यात आले आहे. मिठी नदीच्या रुंदीकरण आणि गाळ काढणे यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजपा नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar) आणि प्रसाद लाड (Prasad Lad) यांनी महाराष्ट्र विधान परिषदेत भ्रष्टाचाराचे आरोप केला होता, राज्य सरकारने यापूर्वी या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आश्वासन दिले होते. सरकारी निर्देशांवर कारवाई करत, मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर (Mumbai CP Vivek Phansalkar) आणि आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलीस आयुक्त निशित मिश्रा यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर चौकशी करण्यासाठी एक विशेष पथक स्थापन केले आहे.तपासाचे प्रमुख केंद्रबिंदू प्रकल्पाला मिळालेल्या कंत्राटदारांची ओळख पटवणे, निधीचे वाटप आणि खर्चाचा मागोवा घेणे, २००५ ते २०२३ पर्यंत काढलेल्या गाळाच्या रकमेचे मूल्यांकन करणे, प्रकल्पांतर्गत केलेल्या सुशोभीकरण कामांचा आढावा घेणे हे असतील. (Mithi River)

(हेही वाचा – ऊर्जा विभागाच्या retired engineers ची अधिकाऱ्यांकडून अवहेलना!)

विशेष पथकाने या प्रकल्पात सहभागी असलेल्या मनीष कासलीवाला कैलाश कन्स्ट्रक्शन, ऋषभ जैन – अ‍ॅक्यूब डिझाइन आणि शिरीष राठोड – मंदीप एंटरप्रायझेस या तीन कंत्राटदारांना समन्स बजावले आहेत. या प्रत्येक कंत्राटदाराला अंदाजे ३०-४० कोटींचे कंत्राट मिळाले होते.

(हेही वाचा – Mhada आणि एसआरएच्या संयुक्त भागीदारीत राबवणार १७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्प)

मिठी नदी मुंबई मनपाच्या अखत्यारीत ११.८४ किमी आणि एमएमआरडीएच्या हद्दीत ६.८ किमी वाहते. दोन्ही एजन्सी वेगवेगळ्या निविदा प्रक्रियांचे पालन करतात, त्यामुळे त्यांना प्रकल्पाशी संबंधित तपशीलवार कागदपत्रे सादर करण्यास सांगण्यात आले आहे. तथापि, पोलिस सूत्रांनुसार, मनपाने अपूर्ण नोंदी सादर केल्या आहेत.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.