Mithun Chakraborty ची हत्या करणाऱ्याला खेरवाडीतून अटक

117
Mithun Chakraborty ची हत्या करणाऱ्याला खेरवाडीतून अटक
  • प्रतिनिधी 

पश्चिम बंगाल येथील स्थानिक बुकी मिथुन चक्रवर्ती (Mithun Chakraborty) याची हत्या करून मुंबईत पळून आलेल्या एका आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वांद्रे पूर्व खेरवाडी येथून अटक केली आहे. रबिउल मिया उर्फ ​​बाबू, (३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रबिउल हा मोहम्मदपूर, पी. एस. नलगोला, जिल्हा मालदा, पश्चिम बंगाल येथे राहणारा आहे. १४ ऑक्टोबर २०२४ रोजी पश्चिम बंगालच्या बन्सीहारी पोलिस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक बुकी मिथुन चक्रवर्ती याची पाच जणांनी मिळून हत्या केली होती. याप्रकरणी बन्सीहारी पोलीस ठाण्याचे भारतीय न्याय संहिता कलम ३३१(८), १०३(२), ३०९(६), ३१०(३), ३१७(३) आणि शस्त्रास्त्र कायदा कलम २५(१अ), १(ब), २७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात बन्सीहारी पोलीस ठाण्याने एका आरोपीला अटक केली होती.

(हेही वाचा – Ajantha Company : अजंठा कॅटामरॅन बोटीचा प्रवासी वाहतूक परवाना निलंबित; त्रिसदस्यीय समितीमार्फत चौकशी)

दरम्यान या गुन्ह्यातील एक आरोपी वांद्रे पूर्व येथील गणेश मंदिर रोड परिसरात, खेरवाडी येथे राहत असल्याची माहिती मुंबई गुन्हे शाखा कक्ष १ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कांबळे यांच्या पथकाला मिळाली होती. कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रवींद्र मांजरे, सपोनि. जितेंद्र शेडगे, पोलीस कॉन्स्टेबल विनोद भाडले, दीपक खेडकर, धर्मेंद्र जुवाटकर या पथकाने सदर ठिकाणी सापळा रचून रबिउल मिया उर्फ ​​बाबू याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने पश्चिम बंगालमध्ये खून आणि दरोडा केल्याची कबुली दिली. रबिउल हा याला अटक करण्यात आली असून तो घटना घडल्यापासून फरार झाला होता. गेल्या दोन महिन्यांपासून लोणावळा परिसरातील एका बांधकाम ठिकाणी मजूर म्हणून काम करत होता. १ जानेवारी २०२५ रोजी तो मुंबईच्या खेरवाडी परिसरात राहायला आला होता. मुंबई गुन्हे शाखेने पश्चिम बंगाल पोलिसांना कळवण्यात आले आहे आणि आरोपीला ताब्यात घेण्यासाठी एक पथक रवाना करण्यात येत आहे. (Mithun Chakraborty)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.