मध्य रेल्वेच्या (Central Railway Mobile Theft) लोकल मार्गावर मागील काही दिवसांपासून मोबाईले चोरीच्या (Mobile theft) घटना वाढत आहेत. संबंधित घटनेमुळे लोकलने प्रवास कारणाऱ्या प्रवाशांच्या मनात भीतीचे वातावरण तयार झाले आहे. दरम्यान, ठाणे ते दिवा, ऐरोली या प्रवासादरम्यान खिसा कापणाऱ्यांचा नाही तर मोबाईल चोरीच्या सर्वाधिक घटना घडल्या आहेत. याविषयीची आकडेवारी धक्कादायक आहे. ही आकडेवारी पाहीली तरी प्रवाशांचा निष्काळजीपणा समोर येईल. या रेल्वे मार्गावर सर्वाधिक मोबाईल (Mobile) चोरी गेल्याचे समोर आले आहे. (Mobile Theft)
4000 मोबाईलची चोरी
प्रवाशांचा निष्काळजीपणा चोरट्यांसाठी फायदेशीर ठरला आहे. ठाणे ते दिवा ऐरोली रेल्वे स्थानकात (Thane to Diva Airoli Railway Station) चोऱ्या वाढल्या आहेत. 3 वर्षात 4000 मोबाईलची चोरी गेल्याचे समोर आले आहे. मोबाईल चोरीला गेल्यावर त्याची अनेक जण फिर्याद देतात. तर काही जण काहीच फायदा होणार नाही म्हणून साधी तक्रार सुद्धा दाखल करत नाहीत. पण ही आकडेवारी धक्कादायक आहे. वर्षाला सरासरी हजार मोबाईल चोरीला गेल्याचे समोर येत आहे. या परिसरात चोरांचा सुळसुळाट असल्याचे समोर येत आहे.
इतक्या प्रकरणाचा उलगडा
ठाणे ते आसपासच्या परिसरात 3 वर्षात 4000 मोबाईलची चोरी गेल्याचे समोर आले आहे. रेल्वे स्थानक (railway station) परिसरातील चोरट्यांचा सुळसुळाट आणि प्रवाशांचा निष्काळजीपणा यामुळे मोबाईल चोरीच्या घटना समोर येत आहेत. तर 1 हजार 494 प्रकरणाचा उलगडा करणे पोलीसांना शक्य झाले आहे.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community