मोहसीन शेख हत्या प्रकरण; धनंजय देसाईंसह २० जणांची निर्दोष मुक्तता

139
२ जून २०१४ रोजी पुण्यातील एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या मोहसीन शेखची जमावाने हत्या केली, या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाई यांच्यासह २० जणांना अटक करण्यात आली होती. या सर्वांची निर्दोष मुक्तता करण्यात आली.

शिवराय आणि शिवसेनाप्रमुखांच्या आक्षेपार्ह फोटोमुळे झालेला वाद 

पुणे सत्र न्यायालयाने सबळ पुराव्या अभावी या सर्व जणांची निर्दोष मुक्तता केली. २ जून २०१४ रोजी पुण्यातील हडपसर परिसरात मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेचे प्रमुख धनंजय देसाईंसह २० जणांना येरवड्यातून अटक केली होती. २०१४ मध्ये आक्षेपार्ह पोस्टमुळे पुण्यात तणाव निर्माण झालेला होता. यावेळी आयटी क्षेत्रातील अभियंता असलेला मोहसीन शेखची हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी पोलिसांनी हिंदू राष्ट्र सेनेच्या धनंजय देसाईंसह २० जणांच्या विरोधात आरोपपत्र दाखल केले होते. सोलापूरमधील काही तरुणांनी जस्टिस फॉर मोहसीन ही चळवळ देखील सुरू केली होती. छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे काही आक्षेपार्ह फोटो फेसबुकवर टाकल्यामुळे २ जून २०१४ मध्ये हडपसरमध्ये दंगल झाली होती. त्यावेळी हिंदू राष्ट्र सेनेने तोडफोड केली होती. याच वेळी मोहसीनला त्याच्या दाढी आणि पेहरावावरून हटकत मारहाण करण्यात आली होती. ज्यात त्याचा मृत्यू झाला होता.
Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.