मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने मनीएज ग्रुप ऑफ कंपनीज (Moneyage Group of Companies) आणि त्याच्याशी संबंधित संस्थांविरुद्ध फसवणूक आणि गुंतवणूकदारांच्या पैशांचा गैरवापर केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे आणि दोन भागीदारांना अटक केली आहे. आरोपी कंपनीच्या विविध योजनांमध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदारांना भरघोस परतावा देण्याचे आश्वासन देत होते आणि त्यांची फसवणूक (financial fraud) करत होते. हरिप्रसाद वेणुगोपाल आणि प्रणव रावराणे अशी अटक आरोपींची नावे आहेत. दरम्यान, आर्थिक गुन्हे शाखेने रायगडमधील १६ एकरांच्या चार भूखंडांसह ठाणे, विरारमधील ८ फ्लॅट जप्त केले आहेत. तसेच, १६ ते १७ बँक खातीही गोठविण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. (MoneyAge Scam)
(हेही वाचा – तंत्रज्ञानाच्या मदतीने आरोग्य क्षेत्रात आमूलाग्र बदल करीत मानवी जीवन सुसह्य करणे शक्य – CM Devendra Fadnavis)
आर्थिक गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत या घोटाळ्यातील फसवणुकीचा आकडा २८ कोटींवर पोहोचला असून, तक्रारी नोंदवून घेण्याचे काम सुरू आहे. यासाठी स्वतंत्र टीम काम करत आहे. जवळपास १५० ते २०० गुंतवणूकदार पुढे आले आहेत. आरोपींनी २०११ मध्ये स्थापन केलेल्या या कंपनीमार्फत वायदे बाजार आणि बांधकाम क्षेत्रात गुंतवणूक करतो, यात बराच नफा होतो. कंपनीच्या माध्यमातून पैसे गुंतवल्यास महिना दोन टक्के किंवा वर्षाला २४ टक्के या दराने परतावा देऊ, असे आमिष दाखवत गुंतवणूकदारांना जाळ्यात ओढले.
जाधवचा शोध सुरू
कंपनीच्या भागीदार आणि प्रमुख आरोपींपैकी असलेल्या प्रिया प्रभू (Priya Prabhu) यांनी अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव घेतली. यावर २२ तारखेला सुनावणी होणार आहे. तसेच त्यांना तपासाला सहकार्य करण्यास सांगण्यात आले असून, त्यानुसार त्यांचा जबाब नोंदवून घेणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले; तर, मास्टरमाइंड राजीव जाधवचा (Rajeev Jadhav) शोध सुरू आहे.
(हेही वाचा – राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण; Swapnil Kusale ला अर्जुन पुरस्कार प्रदान)
मालमत्ता कुठे?
आर्थिक गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत श्रीवर्धनमधील पाच एकर जमिनीसह पालीतील ११ एकरांच्या तीन भूखंडांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. तसेच, ठाणे, टिटवाळा, विरारसह विविध ठिकाणांतील आठ फ्लॅटवर जप्तीची कारवाई करण्यात आली असल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
हेही पाहा –
Join Our WhatsApp Community