Hit And Run प्रकरणात खासदार चंद्रकांत हांडोरेंच्या मुलाला अटक

187
चेंबूर हिट अँड रन (Hit And Run) प्रकरणी गोवंडी पोलीस ठाण्याच्या पथकाने ५ ऑक्टोबर रोजी काँग्रेस खासदार चंद्रकांत हंडोरे यांचा मुलगा गणेश हंडोरे याला अटक केली. गणेश हंडोरे याने 4 ऑक्टोबर रोजी सायंकाळी मोटारसायकलला त्यांच्या कारने धडक दिली होती. जखमी मोटरसायकलस्वार गोपाल आरोटे याच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

(हेही वाचा ‘काँग्रेस ही लूट व फसवणुकीचे पूर्ण पॅकेज’; PM Narendra Modi यांचा कॉंग्रेसवर हल्लाबोल)

गणेश हंडोरे घटनास्थळावरून पळून गेला 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश हंडोरे हा ४ ऑक्टोबर रोजी रात्री कारने गोवंडी येथे ज्यूस पिण्यासाठी गेला होता. परतत असताना चेंबूर येथील आचार्य महाविद्यालयाजवळ दुचाकीला धडक दिल्याने दुचाकी चालक गोपाल आरोटे जखमी झाले. यानंतर गणेश हंडोरे याने गोपाळ आरोटे यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल न करता घटनास्थळावरून पळ (Hit And Run) काढला. या घटनेनंतर स्थानिक लोकांनी गोपालला रुग्णालयात दाखल केले. तपासानंतर गोवंडी पोलिसांनी गणेश हंडोरेविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी पोलिसांनी गणेश हंडोरे याला ५ ऑक्टोबर रोजी अटक केली होती.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.