MSEDCL Fraud Messages : महावितरणच्या नावाने ग्राहकांना फसवणुकीचे मेसेज

96
MSEDCL Fraud Messages : महावितरणच्या नावाने ग्राहकांना फसवणुकीचे मेसेज
MSEDCL Fraud Messages : महावितरणच्या नावाने ग्राहकांना फसवणुकीचे मेसेज

आपले मागच्या महिन्यातील बिल थकीत असून आतापासून तुमची वीज खंडित करण्यात येत आहे. ही कारवाई थांबविण्यासाठी या नंबरवर संपर्क साधा, असा वैयक्तिक मेसेज (Fraud Message) शहरातील ग्राहकांच्या मोबाईल नंबरवर येऊ लागले आहेत. संबंधित नंबरला फोन केला असता फोनमध्ये गुंतवून माहिती काढून ऑटोमॅटिक ओटीपी जनरेट करून खाते रिकामे करण्याचा नवीन फंडा सुरू झाला आहे. महावितरण विभागाकडून (Mahavitaran Department) मोहीम हाती घेतली की, फेक कॉल करण्याचा फंडाही दोन वर्षांपासून वाढला आहे. मागील महिन्याचे वीज भरणा अपडेट नसल्याचे कारण देत वैयक्तिक मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे बनावट ‘एसएमएस’ नागरिकांना पाठविण्यात येत होते. (MSEDCL Fraud Messages)

(हेही वाचा – स्वातंत्र्यवीर सावरकरांविषयी अपशब्द वापरणाऱ्या ‘हाताला’ निवडून देणार का?; Raj Thackeray यांचा सवाल)

दरम्यानच्या काळात हिंदी भाषेतून फोन येत आणि ओटीपीची विचारणा करून खातेच रिकामा केल्याची अनेक घटना घडल्या. त्यानंतर महावितरणने हिंदी भाषेतून येणारे फोन हे फेक (Fake Call) असल्याचे सांगितले.

हेही पाहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.