मुलुंड पश्चिम येथील एका उच्चभ्रू सोसायटीतील पार्किंगच्या जागेवरून सोसायटीत राहणाऱ्या एका महिला सभासदाच्या छळाला कंटाळून सोसायटीतील जेष्ठ नागरिक असलेल्या सभासदाने मुलुंड रेल्वे स्थानकात ट्रेनखाली आत्महत्या केली आहे.या प्रकरणी मुलुंड पोलीस ठाण्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी कुमकुम मिश्रा (Kumkum Mishra) या महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक टाळण्यासाठी महिलेने न्यायालयात धाव घेतली असता न्यायालयाने तीला अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. (Mulund Crime)
(हेही वाचा- Global Cyber Security Index 2024 : भारताने जागतिक सायबर सुरक्षा निर्देशांकात मिळवला टियर 1 दर्जा)
खुशाल कांजी दंड असे आत्महत्या करण्यात आलेल्या जेष्ठ सभासदाचे नाव आहे. मुलुंड पश्चिम जे. एन. रोड येथील मनीषा प्राईड या उच्चभ्रू सोसायटी पत्नी अनुसयासह राहण्यास होते. त्याच सोसायटीत राहणाऱ्या कुमकुम मिश्रा यांच्याकडे वाहन पार्किंगसाठी पार्किंग जागा नसल्यामुळे त्यांनी खुशाल यांच्या तात्पुरते पार्किंग जागेवर त्यांचे वाहन उभी करण्यासाठी खुशाल यांची परवानगी घेतली होती. दंड यांनी तात्पुरती ती जागा कुमकुम मिश्रा (Kumkum Mishra) यांचे वाहन पार्किंगसाठी दिली होती. दरम्याम खुशाल दंड यांच्याकडे वाहन नसल्यामुळे ती जागा आम्हाला देण्यात यावी अशी मागणी कुमकुम यांनी त्यांच्याकडे केली होती, परंतु खुशाल दंड यांनी त्यासाठी नकार दिला होता. (Mulund Crime)
अखेर या पार्किंगच्या जागेवरून हा वाद वाढत गेला, कुमकुम ही खुशाल दंड यांच्या घरासमोर येऊन त्यांना शिवीगाळ व अर्वाच्य भाषा वापरून त्यांचा मानसिक छळ करू लागली. तसेच पोलिसांत दंड यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्याची धमकी देऊन मुलुंड पोलीस ठाण्यात खुशाल दंड यांच्या विरुद्ध तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यात खुशाल दंड यांची बायपास सर्जरी झाल्यामुळे त्यांना कुमकुम मिश्रा हिच्या मानसिक छळामुळे अधिक त्रास होऊ लागला होता. अखेर गेल्या महिण्यात खुशाल दंड यांनी मुलुंड रेल्वे स्थानकात रेल्वेखाली आत्महत्या केली. (Mulund Crime)
(हेही वाचा- Cyber attack : हॅकर्सची नजर सुप्रीम कोर्टावरही; पाकिस्तान नाही तर या देशाचा सायबर हल्ल्यात सर्वात मोठा हात)
या प्रकरणी त्याची पत्नी अनुसया यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात कुमकुम मिश्रा हिच्या विरुद्ध तक्रार दाखल केली, पोलिसांनी कुमकुम विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. कुमकुम मिश्रा (Kumkum Mishra) यांनी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता, न्यायालयाने कुमकुम मिश्रा यांना अटीवर अटकपूर्व जामीन मंजूर करून प्रत्येक आठवड्यातुन एक दिवस मुलुंड पोलीस ठाण्यात हजेरी लावायची आणि पोलिसांना तपासात सहकार्य करायचे या अटीवर जामीन मंजूर केला आहे. (Mulund Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community