मुंबईत पुन्हा हिट अँड रन (Hit and Run Case) ची घटना घडली आहे. भरधाव ट्रकच्या धडकेत महिलेचा मृत्यू झाल्याची घटना मुंबईतील मुलुंड (Mulund) परिसरात घडली आहे. या अपघातादरम्यान ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे. पोलिसांनी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध घेत आहेत. (Hit and Run Case)
हेही वाचा- Blocked URLs : केंद्र सरकारने ब्लॉक केले २८ हजार URL; नेमकं कारण काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड पश्चिम भागातील एटीगेटेड कमल सोसायटीत मृत महिला तिच्या पती व मुलीसोबत राहत होती. शनिवारी रात्री ११च्या सुमारास ही महिला आपल्या पती पुनिमिया (Vishal Punimia) आणि मुलीसोबत दुचाकीने तांबेनगर परिसराकडे चालले होते. त्याचवेळी मुलुंड गोरेगाव लिंक रोड परिसरात पाठीमागून येणाऱ्या ट्रकने विशाल यांच्या बाइकला जोरदार धडक दिली. हि धडक इतकी जोरदार होती कि, अमृता ट्रकच्या चाकाखाली आली.अमृता यांना तातडीने नजीकच्या हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. (Hit and Run Case)
हेही वाचा- Mahakal Temple: महाकाल मंदिरात आता ATM सारख्या मशीनमधून लाडू प्रसाद मिळणार; पेमेंट कसे होणार?
या अपघातात विशाल आणि त्यांची मुलगी जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळावरून ट्रकचालकाने पलायन केले असून पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मुलुंड पोलिसांनी दिली आहे. या घटनेने पुनमिया कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसला आहे. (Hit and Run Case)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community