पोलिसांनी जप्त केलेला लाखो रुपयांच्या गुटख्यावर घुशींकडून ताव मारण्यात येत आहे, मुलुंड पोलीस ठाण्याच्या (Mulund Police Station) आवारात उघड्यावर पडलेल्या गुटख्याच्या गोण्यातील गुटख्याचे पाकिटे घुसीकडून पळवली जात आहे. मोठ्या प्रमाणात उघड्यावर पडलेला हा गुटखा मुलुंड पोलिसांनी २०२१ मध्ये जप्त केला होता, मागील तीन वर्षांपासून हा गुटखा उघड्यावर पडलेला असून त्याचे विषात रूपांतर झाले असावे अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा गुटखा लवकरात लवकर नष्ट करण्यात आला नाही तर हा गुटख्यामुळे एखादी घटना घडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
(हेही वाचा- हाय फ्रिक्वेन्सी रिसीविंग स्टेशन गोराईला स्थलांतरित करा; Ashish Shelar यांची हवाई उड्डाण मंत्र्यांकडे मागणी)
मुलुंड पोलिसांनी (Mulund Police Station) २०२१ साली मुलुंड येथून भांडुपला जाणारा संशयित टेम्पो पकडला होता, त्या टेम्पोत मोठ्या प्रमाणात गुटखा मिळून आला होता, या कारवाई नंतर पोलिसांनी शीळ डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून आणखी ४ टेम्पो भरून गुटखा जप्त करून काही जणांना अटक करण्यात आली होती. जप्त करण्यात आलेला गुटखा जवळपास २० लाख रुपयांचा घरात होता, जप्त करण्यात आलेला गुटख्यात मोठ्या प्रमाणात गोवा गुटखा सह वेगवेगळ्या कंपनीचा गुटख्याने भरलेल्या गोण्या मिळून आलेल्या होत्या.
या प्रकरणी पोलिसांनी कायदेशीर कारवाई करून जप्त करण्यात आलेला गुटखा हा पोलीस ठाण्याच्या एका खोलीत सुरक्षित ठेवण्यात आला होता, काही कालावधीने गुटखाच्या गोण्या खोलीतून काढून पोलीस ठाण्याच्या आवारात उघड्यावर ठेवण्यात आल्या , उघडयावर ठेवण्यात आलेल्या या गोण्या रात्रीच्या सुमारास घुशी आणि उंदराने कुरतल्यामुळे गोण्यातील गुटख्यांचे पाकिटे उघड्यावर पडलेल्या आहे, त्यातील गुटख्यांचे पाकिटे रात्रीच्या सुमारास घुसीं उंदीर फस्त करीत आहे, तर काही जण हे गुटख्याची पाकिटे चोरी करून घेऊन जात असल्याची शक्यता स्थानिक पोलीसांकडून वर्तवली जात आहे. तीन वर्षे जुना गुटखा त्यात पाऊस आणि उन्हामुळे खराब होऊन त्याचे विषात रूपांतर झाले आहे. उघड्यावर पडलेला गुटखा खाऊन मोठी घटना घडण्याची शक्यता आहे. (Mulund Police Station)
नष्ट करण्याची प्रक्रिया……
या संबंधी एका अधिकारी यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, जप्त करण्यात आलेला गुटखा नष्ट करण्याची जवाबदारी पूर्वी फूड अँड ड्रग्स विभागाची होती, त्यानंतर मात्र न्यायालयाकडून परवानगी घेऊन पोलिसांकडून जप्त करण्यात आलेला गुटखा नष्ट केला जात आहे. जो पर्यत न्यायालयाकडून नष्ट करण्याची परवानगी मिळत नाही तो पर्यत गुटखा अथवा अन्य अमली पदार्थ सुरक्षित स्थळी ठेवण्याची जवाबदारी संबंधित पोलीस ठणयाची असते,जेणेकरून त्याचा गैरवापर होऊ नये. मुलुंड पोलिसांनी जप्त केलेला गुटखा उघड्यावर टाकून एखाद्या घटनेला आमंत्रण देण्यासारखे आहे. आम्ही न्यायालयाकडून लवकरच परवानगी घेऊन गुटखा नष्ट करण्यात येईल, याबाबत प्रक्रिया सुरू असल्याचे एका अधिकारी यांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले. (Mulund Police Station)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community