Mumbai Airport : ज्वलनशील पदार्थ विमानातून घेऊन जाणाऱ्या प्रवाशासह ५ जणांना अटक

153
Mumbai Airport : ज्वलनशील पदार्थ विमानातून घेऊन जाणाऱ्या प्रवाशासह ५ जणांना अटक

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) शुक्रवारी मोठी दुर्घटना टळली, मुंबईहुन दुबईला निघालेल्या प्रवासी विमानात लगेच लोड करताना एका बॅगेतून धूर येऊन आग लागल्याची घटना घडली. विमानतळावरील सुरक्षा यंत्रणांनी तात्काळ ज्या बॅगेतून धूर येत होता, ती बॅग सुरक्षित स्थळावर आणून तपासली असता त्या बॅगेत ज्वलनशील केमिकल आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. केमिकल असलेली बॅग विमानतळ लोड करण्यापूर्वी हा प्रकार घडल्यामुळे पुढील मोठी दुर्घटना टळली.

मुंबईतील सहार पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून एका प्रवाशासह पाच जणांना अटक केली आहे, हे पार्सल मागविणारी व्यक्ती दक्षिण आफ्रिकेतील कांगो देशात बसला असून त्याला देखील आरोपी करण्यात आले आहे. जप्त करण्यात आलेले केमिकल हे अत्यंत ज्वलनशील केमिकल असून विमानात ज्वलनशील पदार्थ घेऊन जाण्यास बंदी असताना हे केमिकल विमानापर्यंत कसे गेले याबाबत तपास सुरू आहे.

(हेही वाचा – Assembly Election 2024 : मुंबईत सहा अतिरिक्त जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती)

समीर नारायणचंद्र बिस्वास (३१), नंदन यादव (२८), सुरेश सुब्बा सिंग (४६), विश्वनाथ सेंजूरधर (३७), अखिलेश यादव (२८) असे अटक करण्यात आलेल्या पाच जणांची नावे आहेत. समीर नारायणचंद्र बिस्वास हा इथोपियन एअरलाईन्स च्या ईटी-६४१ या विमानाने मुंबई ते आदिस अबाबा या विमानातून दुबई व्हाया कांगो या देशात नोकरीसाठी निघाला होता, कोंगो येथे असणारा त्याचा मालक नवीन शर्मा याने त्याला मुंबईहून येताना बॅगा सोबत घेऊन यायला सांगितले होते, परंतु या बॅगेत काय आहे याची कल्पना समीरला नव्हती.

अंधेरी पूर्व मरोळ नाका येथे राहणारा नंदन यादव याने त्याला ज्वलनशील केमिकल असलेली बॅग कोंगो येथे नवीन शर्माला देण्यासाठी दिली होती. सुरेश सुब्बा सिंग याचे अंधेरी कार्गो येथे लॉजीस्टिकचा व्यवसाय आहे, त्याने कांगो देशात असलेल्या नवीन शर्मा आणि विश्वास सेंजूरकर यांच्या सांगण्यावरून ज्वलनशील केमिकल असलेली बॅग यादवच्या मदतीने समीर बिस्वास याच्यापर्यंत पोहचवली होती. सेंजूरकरने नवीन शर्माच्या सांगण्यावरून केमिकलच्या बॅग सुरेश सिंग यांच्या लॉजीस्टिक कंपनीकडे सोपविण्यात आलेल्या होत्या. नंदन यादवने समीरला दिलेल्या बॅग समीरने शुक्रवारी सकाळी मुंबई विमानतळावर तपासणीसाठी पाठवली, व तो विमानात जाऊन बसला होता, केमिकल असणाऱ्या या बॅग तपासणीसाठी स्कॅन मशीन मधून सुरक्षित बाहेर आल्या. (Mumbai Airport)

(हेही वाचा – CM Eknath Shinde : सरकारने घेतला खड्ड्यांचा धसका; खड्डेमुक्त रस्त्यांसाठी ३१ ऑगस्टपर्यंतची डेडलाईन)

त्यानंतर या बॅगा विमानातील लगेचमध्ये चढविण्यासाठी बेल्टवर आल्यानंतर एका बॅगमधून धूर येत असल्याचे कर्मचाऱ्याच्या लक्षात आले, त्याने तात्काळ त्या बॅग बाहेर कडून सुरक्षा यंत्रणेला कळवले. विमानतळावरील सुरक्षा यंत्रनाणी तात्काळ बॅगेची आग विझवून सहार पोलिसांना कळविण्यात आले. सहार पोलिसांनी विमानात बसलेल्या प्रवासी समीर बिस्वास याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने तो नोकरीसाठी कांगो देशात निघाला होता, व तो ज्या ठिकाणी नोकरी करणारा होता तेथील मालक नवीन शर्मा याने मुंबईहून या बॅग आणण्यासाठी सांगितले होते अशी माहिती पोलिसांना दिली, तसेच त्याच्यापर्यंत बॅग पोहचविणाऱ्या इतर चौघांना मुंबईतील विविध परिसरातून पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी जप्त करण्यात आलेले केमिकल हे हायड्रोजन परॉक्साईड, टायटॅनिम डायऑक्सइड हे अति ज्वलनशील केमिकल असून हे केमिकल डायसाठी वापरले जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. हे केमिकल कांगो येथे कशासाठी मागविण्यात आले होते, त्यामागे नक्की काय हेतू होता याचा तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त दीक्षित गेडाम यांनी दिली, वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. (Mumbai Airport)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.