Mumbai Airport : विमानतळावर सापडलेल्या मृत अर्भकाला जन्म देणारी निघाली कुमारिका

92
Mumbai Airport : विमानतळावर सापडलेल्या मृत अर्भकाला जन्म देणारी निघाली कुमारिका
Mumbai Airport : विमानतळावर सापडलेल्या मृत अर्भकाला जन्म देणारी निघाली कुमारिका

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (Mumbai Airport) टी-२ येथील स्वच्छता गृहातील कचराकुंडीत आढळून आलेल्या नवजात अर्भकाच्या जन्मदात्रीचा शोध लागला आहे. आईसोबत रांचीला (Ranchi) निघालेल्या एका १६ वर्षीय कुमारीकेला विमानतळावर प्रसूती कळा सुरू झाल्या आणि तेथील स्वच्छतागृहात तिचा गर्भपात झाला, आणि त्या मुलीने मृत जन्माला आलेले अर्भक कचराकुंडीत फेकून थेट रांचीला (Ranchi) निघून जाण्याचा निर्णय घेतला. सहार पोलिसांनी सीसीटीव्ही कॅमेराच्या माध्यमातून कुमारिका मातेची ओळख पटवली आहे. दरम्यान सहार पोलिसांनी १६ वर्षाच्या कुमारिकेवर लैंगिक अत्याचार करून तिला गर्भवती ठेवणाऱ्या व्यक्तीवर बलात्कार (Rape), पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा – Mahad एमआयडीसी बांगलादेशींसह नक्षलवाद्यांचे बनले आश्रयस्थान?)

मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील (Mumbai Airport) सफाई कर्मचाऱ्यांना (Cleaning staff) मंगळवारी टी-२ येथील महिलांच्या स्वच्छतागृहातील एका डब्यात मृत अर्भक आढळले होते. पोलिसांनी सांगितले की विमानतळावरील कॅमेऱ्यांमधील फुटेजचा तपास केल्यानंतर त्यांनी एका अल्पवयीन मुलींवर लक्ष केंद्रित केले, मुलगी तिच्या आई सोबत प्रवास करीत होती. मुलीच्या हालचालीवरून पोलिसांना संशय येताच पोलिसांनी मुलीची ओळख पटवली. पोलिसांनी सांगितले की, महाविद्यालयीन विद्यार्थींनी असलेली मुलगी आणि तिची आई रांचीला (Ranchi) जाणाऱ्या विमानाने प्रवास करणार होते तेव्हा तिला प्रसूती वेदना जाणवू लागल्या. मुलीने आणि तिच्या आईने दावा केला की तिचा ‘गर्भपात’ झाला. याप्रकरणी बाळाचा जन्म झाला होता का?, तिने मृत बाळाला जन्म दिला आहे का?, कचराकुंडीत टाकून दिलेला गर्भ आहे का? याची पडताळणी करण्यात येत आहे. शवविच्छेदन तपासणीची प्रतीक्षा आहे, असे सहार पोलिस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले, मुलगी अल्पवयीन असल्याने, ज्या पुरूषाशी तिचे लैंगिंक संबंध आले त्याच्याविरुद्धही बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

(हेही वाचा – Google Gemini 2.5 Pro : चॅट जीपीटीच्या व्हायरल गिबली स्टुडिओला शह देण्यासाठी गुगलचं जेमिनी २.५ प्रो ग्राहकांसाठी बाजारात)

पोलीसांनी मुलीचा आणि तिच्या आईचा शोध घेऊन त्यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. तिने पोलिसांना सांगितले आहे की तिचा स्वच्छतागृहात गर्भपात झाला. तर आईने सांगितले की तिने मुलीला ‘गर्भ’ स्वच्छतागृहातील कचराकुंडीत टाकण्यास मदत केली, असे अधिकाऱ्याने सांगितले. मुलगी आणि आईचा फ्लाइट तिकीट बुकिंगच्या तपशीलांवरून शोध घेण्यात आला. कुमारीमातेच्या आईने पोलिसांच्या चौकशीत म्हटले आहे, तिची मुलगी सात महिन्याची गर्भवती असल्याचे तिला माहित होते. त्यांना कौटुंबिक समारंभाला रांची (Ranchi) येथे जायचे होते, बस किंवा ट्रेनमधून प्रवास केल्यास अडचण येऊ शकते, म्हणून त्यांनी विमानाने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. कुमारीमातेने म्हटले आहे की, तिची प्रकृती आता स्थिर आहे, परंतु पोलिसांनी सांगितले की तिची वैद्यकीय चाचणी केली जाईल. मुलगी आणि तिच्या आईने पोलिस ठाण्यात त्यांचे जबाब नोंदवल्यानंतर, त्यांना नोटीस बजावण्यात आली आणि त्यांना जाऊ देण्यात आले. सहार पोलिसांनी अल्पवयीन मुलीसोबत शारीरिक संबंध ठेवलेल्या व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची ओळख पटवून त्याला अटक करण्याची तरतूद ठेवण्यात आली आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.