Cocaine Seized at Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विदेशी महिलेने वीगमध्ये दडवले होते ‘हे’ साहित्य; महसूल विभागाने केली कारवाई

Cocaine Seized at Mumbai Airport : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर युगांडा देशातून आलेल्या महिलेकडून ८९० ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे.

208
Cocaine Seized at Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विदेशी महिलेने वीगमध्ये दडवले होते 'हे' साहित्य; महसूल विभागाने केली कारवाई
Cocaine Seized at Mumbai Airport : मुंबई विमानतळावर विदेशी महिलेने वीगमध्ये दडवले होते 'हे' साहित्य; महसूल विभागाने केली कारवाई

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून महिलेच्या डोक्यावर लावलेल्या वीग, तसेच अंतर्वस्त्रातून ८९० ग्रॅम कोकेन (Cocaine) जप्त करण्यात आले आहे. त्याची किंमत तब्बल नऊ कोटी रुपये असल्याचे सांगितले जात आहे. ही महिला युगांडा (Uganda) देशातील असल्याची माहिती आहे. (Cocaine Seized at Mumbai Airport)

मंगळवार, २० डिसेंबर रोजी पहाटेच्या सुमारास डीआरआयकडून ही कारवाई करण्यात आली आहे. महिलेने ज्या शिताफीने हे कोकेन (Cocaine) लपवले होते, ते पाहून महसूल गुप्तचर संचालनालयाचे (DRI) अधिकारी देखील चकित झाले होते. याबाबत अधिक तपास सुरु असल्याचे डीआरआयकडून सांगण्यात येत आहे.

(हेही वाचा – Bogus Doctors : बोगस डॉक्टरांविरोधात धडक मोहिम राबवणार; हसन मुश्रीफ यांची माहिती)

मिळालेल्या माहितीनुसार, सदर महिला छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Chhatrapati Shivaji Maharaj International Airport) उतरली होती. या वेळी या महिलेने डोक्याला विग लावल्याचे आढळून आले. तो पाहून महसूल गुप्तचर विभागाला (Revenue Intelligence Division) संशय आल्याने त्यांनी त्या महिलेची चौकशी केली. त्यानंतर त्या महिलेने लावलेल्या विगमध्ये प्लास्टिक कव्हरमध्ये ठेवलेल्या कोकेनच्या (Cocaine) छोट्या छोट्या पुड्या आढळून आल्या.

या पुड्यांमध्ये ८९० ग्रॅम कोकेन होते. हे ड्रग्स महसूल गुप्तचर विभागाने जप्त केले असून त्याची किंमत ८ कोटी ९० लाख रुपये इतकी आहे. त्या महिलेला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. (Cocaine Seized at Mumbai Airport)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.