सेबीच्या माजी प्रमुख Madhabi Puri Buch यांच्यावर गुन्हा दाखल होणार

186
सेबीच्या माजी प्रमुख Madhabi Puri Buch यांच्यावर गुन्हा दाखल होणार
सेबीच्या माजी प्रमुख Madhabi Puri Buch यांच्यावर गुन्हा दाखल होणार

सेबीच्या (SEBI) माजी प्रमूख माधवी बूच पूरी (Madhabi Puri Buch) यांच्यावर शेअर बाजारातील घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याप्रकरणी विशेष न्यायालयाने भ्रष्टाचार विरोधी पथकाने माधवी बूच पुरी (Madhabi Puri Buch) व अन्य अधिकारी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत.

( हेही वाचा : Uttarakhand Avalanche : उत्तराखंड हिमस्खलन, ४ जणांचा शोध सुरू; ५० कामगारांना वाचवण्यात यश)

दरम्यान विशेष एसीबी न्यायालयाचे न्यायाधीश शशिकांत बांगर (Shashikant Bangar) यांनी दि. १ मार्च रोजी आदेश पारित केले आहेत. प्रथमदर्शनी मिळालेल्या पुराव्यानुसार याप्रकरणी संगनमताने घोटाळा झाल्याचे निर्दशनास आले आहे. याची निपःक्षपणे चौकशी होणे गरजेचे असून ३० दिवसांत याचा अहवाल द्यावा लागेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

या संदर्भात केलेल्या याचिकाकर्त्यांने विविध आरोप केले आहेत. मोठ्या प्रमाणात पैशांची अफरातफर झाली असून सेबीच्या नियमांचे उल्लंघन करुन व्यवहार झाले आहेत. सेबीच्या (Securities and Exchange Board of India) माजी अध्यक्षांनी कर्तव्यात कसूर केली आहे. त्यामुळे बाजारात हेराफेरी करण्यासाठी चालना मिळाली. त्याचबरोबर नियमात न बसणाऱ्या कंपन्याना शेअर बाजारात (Stock market) लिस्टेड करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्यामुळे कार्पोरेट फसवणूक झाली असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणने आहे. (Madhabi Puri Buch)

हेही पाहा :

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.