दक्षिण मुंबईतील ग्रँटरोड येथील एका हॉटेलच्या खोलीत १४ वर्षीय मुलगी मृत व्यापाऱ्यासोबत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या व्यापाऱ्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे.रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. ४२ वर्षीय मृत व्यापारी गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारा असून पोलिसांनी त्यांच्या कुटूंबियांना कळविण्यात आले आहे.पोलिसांच्या प्राथमिक तपासात हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाला असावा अशी शक्यता आहे. दरम्यान डी. बी. मार्ग पोलिसांनी व्यापाऱ्यावर पोक्सो कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
संजय कुमार रामजीभाई तिवारी (४२) असे मृत व्यापाऱ्याचे नाव आहे. संजय तिवारी (Sanjay Tiwari) हा गुजरात राज्यातील सुरत येथे राहणारा असून संजय कुमार हा शनिवारी मुंबईतील ग्रांट रोड येथील एका हॉटेलवर आला होता, त्याच्यासोबत १४ वर्षांची मुलगी होती. संजय तिवारी याने हॉटेल मध्ये एक खोली घेतली होती, दिवसभरात संजय तिवारी (Sanjay Tiwari) याने घेतलेल्या खोलीतून कुठलीही हालचाल आढळून न आल्यामुळे हॉटेलच्या केअरटेकरने संशय आल्याने त्याने पोलिसांना कळवले. डी. बी. मार्ग पोलिसांनी तात्काळ हॉटेलवर धाव घेऊन ड्युप्लिकेट चावीने खोली उघडली असता खोलीत एक व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत बेडवर पडलेला होता व त्याच्यासोबत असलेली मुलगी एका कोपऱ्यात घाबरलेल्या अवस्थेत आढळून आली. (Mumbai Crime)
(हेही वाचा – उड्डाण क्षेत्रात महिलांना समान संधी मिळणे महत्त्वाचे; राष्ट्रपती Droupadi Murmu यांचे प्रतिपादन)
पोलिसांनी तात्काळ संजय तिवारी (Sanjay Tiwari) याला जे.जे. रुग्णालयात आणले असता डॉक्टरानी तपासून मृत घोषित केले, पोलिसांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. दरम्याम खोलीत मिळून आलेल्या मुलीकडे चौकशी करण्यात आली असता ती काहीही बोलण्याच्या अवस्थेत नव्हती, पोलिसांनी तिच्या कुटूंबातील व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळवुन मुलीच्या आईशी संपर्क साधला असता संजय तिवारी हा मुलीला बळजबरीने घेऊन गेला असे पीडित मुलीच्या आईने पोलिसांना सांगितले. (Mumbai Crime)
पोलिसांनी मृत संजय तिवारी (Sanjay Tiwari) विरुद्ध पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तिवारीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला असावा अशी शक्यता आहे, तिवारी यांच्या शवविच्छेदन अहवाल अद्याप आलेला नसून शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community