Mumbai Crime : मुंबईत घरफोडीचे ५३१ गुन्हे दाखल

149
Mumbai Crime : मुंबईत घरफोडीचे ५३१ गुन्हे दाखल

गेल्या पाच महिन्यांत मुंबईत घरफोडीचे ५३१ गुन्हे दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. ५३१ पैकी ३१२ घरफोडीच्या गुन्ह्यांची उकल झाली आहे. तसेच यातील ४२२ गुन्हे रात्रीच्या वेळी झाले आहेत. मे महिन्यात १०६ घरफोडीचे गुन्हे झाले. मुंबई पोलिसांकडून (Mumbai Police) ही आकडेवारी देण्यात आली आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत या घटना घडल्या आहेत. (Mumbai Crime)

सुट्टीनिमित्ताने अनेक जण घराबाहेर असतात. याच संधीचा फायदा घेत अनेकांच्या घरात चोरांनी डल्ला मारला आहे. अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलिसांकडून गस्त वाढवून नागरिकांमध्ये जनजागृती करण्यावर भर देण्यात येत आहे. तसेच साध्या वेशातही चौकाचौकांत वॉच ठेवून पोलिसांकडून आरोपीची धरपकड सुरू आहे. (Mumbai Crime)

(हेही वाचा – Global Valuable Brands : भारताच्या ४ कंपन्या जागतिक १०० मौल्यवान ब्रँडच्या यादीत)

सुट्टीनिमित्ताने बाहेर गेल्यानंतर अनेक जण सोशल मीडियावर फोटो टाकतात. सोशल मीडियावरील पोस्टमुळे चोराला एकप्रकारे निमंत्रणच देण्यात येते. त्यामुळे यावरही कुठे तरी नियंत्रण आणणे गरजेचे असल्याचे मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) म्हणणे आहे. (Mumbai Crime)

२०२० मध्ये लॉकडाऊनच्या सुरुवातीला एप्रिल आणि मे महिन्यात शहरातील गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात घट झाली होती. मात्र, सर्वत्र अनलॉक होताच गुन्हेगारांनी पुन्हा डोके वर काढले. घरफोडीसह चोरी, वाहन चोरल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली. (Mumbai Crime)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.