दक्षिण मुंबईतील अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची लाचेची मागणी करून खाजगी इसमाच्या मार्फत ८ लाख रुपये स्वीकारताना मुंबई महानगर पालिकेच्या दोन दोन अभियंतासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Mumbai Crime)
(हेही वाचा- Navi Mumbai Metro: सोमवारपासून नवी मुंबईहून धावणाऱ्या मेट्रोच्या वेळेत होणार ‘हे’ नवीन बदल, जाणून घ्या…)
मंगेश कांबळी (Mangesh Kambli) ,सूरज पवार (Suraj Pawar) असे मनपा अभियंताची नावे असून निलेश होडार (Nilesh Hodar) हा खाजगी इसम आहे. मुंबई महानगर पालिकेच्या ‘सी वॉर्ड’ येथे मंगेश कांबळी (Mangesh Kambli) हे कनिष्ठ अभियंता असून पवार हे दुय्यम अभियंता आहे. दक्षिण मुंबईतील चंदन वाडी येथे असलेल्या एका पाच मजली इमारतीच्या टेरेसवर करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकाला मनपा सी वॉर्ड (Municipality C Ward) कडून बांधकाम पाडण्यासाठी नोटीस बजावण्यात आली होती. (Mumbai Crime)
या नोटीस संदर्भात तक्रारदार हे सी वॉर्ड येथे कनिष्ठ अभियंता आणि दुय्यम अभियंता कांबळे आणि पवार यांची भेट घेण्यासाठी गेले असता कांबळे आणि पवार यांनी अनधिकृत बांधकामावर कारवाई न करण्यासाठी २० लाख रुपयांची मागणी केली होती.या संदर्भात तक्रारदार यांनी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. शुक्रवारी लाचेचा पहिला हप्ता ८ लाख रुपये घेण्यासाठी कांबळे आणि पवार यांनी खाजगी इसम निलेश होडार याला तक्रारदार यांच्याकडे पाठवले असता लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रचलेल्या सापळ्यात निलेश होडार हा लाचेचा पहिला हप्ता स्वीकारताना पकडला गेला. (Mumbai Crime)
(हेही वाचा- PM Narendra Modi: पंतप्रधान मोदींनी वाढवला कार्यकर्त्यांचा उत्साह; दिल्या भाजप स्थापना दिनाच्या शुभेच्छा)
या प्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या चौकशीत ही लाचेची रक्कम कांबळे आणि पवार यांना देण्यासाठी घेण्यात आल्याचे निष्पन्न झाले.लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने याप्रकरणी कनिष्ठ अभियंता मंगेश कांबळी (Mangesh Kambli) आणि दुय्यम अभियंता पवार सह खाजगी इसम निलेश होडार याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. (Mumbai Crime)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community