पॅरोल वरून बाहेर पडलेल्या गुंडाने एकावर गोळीबार (Firing) केल्याची घटना शनिवारी पहाटे सायन कोळीवाडा परिसरात घडली. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या गोळीबाराच्या घटनेमुळे मुंबईत एकच खळबळ उडाली असून अँटॉप हिल पोलीस ठाण्यात हत्येचा प्रयत्न केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर पळून गेलेल्या गुंडाचा मुंबई गुन्हे शाखेसह अँटॉप हिल पोलीस ठाणे कसून शोध घेत आहे. (Firing)
विवेक चेत्तीयार असे गोळीबार (Firing) करणाऱ्या गुंडांचे नाव आहे, तर आकाश स्वामी असे गोळीबारात जखमी झालेल्याचे नाव आहे. विवेक चेत्तीयार आणि आकाश स्वामी हे दोघे मित्र असून सायन कोळीवाडा, अँटॉप हिल परिसरात राहण्यास आहे. विवेक याच्यावर जवळपास ९ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे तसेच आकाश याच्यावर हत्येचा प्रयत्नचा एक गुन्हा दाखल आहे. विवेकला गोरेगाव येथे २०१७ मध्ये झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा झाली होती, कोविड काळात तो पेरॉलवर तुरूंगातुन बाहेर आला होता, त्यानंतर तो तुरुंगात न जाता फरार झाला होता अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. (Firing)
(हेही वाचा – Raj Thackeray : मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी शिंदे गटाचे प्रवक्ते शिरसाट राज ठाकरेंना भेटले; चर्चेला उधाण )
अशी घडली घटना
शुक्रवारी रात्री विवेक आणि आकाश एकत्र बसून दारू प्यायले त्यावेळी दोघांमध्ये पैशांवरून वाद झाला, वाद शांत झाल्यानंतर आकाश हा घरी गेला निघून गेला होता, पहाटे ५ वाजण्याच्या सुमारास विवेक हा आकाशच्या घरी आला व त्याने दाराची कडी वाजवली, आकाशने दार उघडताच विवेकने स्वतः जवळ असलेले देशी पिस्तुल आकाशच्या पोटावर लावून दोन गोळ्या झाडून विवेकने तेथून पळ काढला. या गोळीबारात (Firing) विवेक हा गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. गोळीबाराच्या (Firing) घटनेनंतर पळून गेलेल्या विवेक चेत्तीयार याच्याविरुद्ध हत्येच्या प्रयत्नचा गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्या शोध घेण्यासाठी गुन्हे शाखा, अँटॉप हिल पोलीस ठाणे विवेकच्या मागावर आहेत. (Firing)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community