निवडणूक काळात पैशांच्या अवैध वाहतुकीवर (Mumbai Crime) निवडणूक आयोगाकडून नेमण्यात आलेली भरारी पथकं लक्ष ठेवून आहे. निवडणूक काळात प्रामुख्याने रोकड, दारू, अमली पदार्थ, मौल्यवान वस्तूंची मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक होत असते. त्यासाठी मुंबई शहर, उपनगर तसेच मुंबई लगतच्या शहरांच्या वेशीवर नाकाबंदी करण्यात आली असून गाड्यांची तपासणी सुरु आहे. हे सर्व सुरु असताना मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मोठी कारवाई केली आहे. (Mumbai Crime)
बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड
मुंबई पोलिसांनी शनिवारी (४ मे) रात्री बीकेसी परिसरातील बनावट नोटा तयार करणाऱ्या कारखान्यावर धाड टाकली. वांद्रे-कुर्ला संकुल येथील भारत नगर परिसरातील या कारखान्यात बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. या कारखान्यात 5,10,100,500 रुपयांच्या बनावट नोटा तयार केल्या जात होत्या. पोलिसांनी याठिकाणी धाड टाकून बनावट नोटा आणि त्यासाठी लागणाऱ्या कागदाचा साठा जप्त केला. (Mumbai Crime)
बनावट नोटा तयार झाल्यानंतर कुठे वितरीत केल्या जात होत्या?
याप्रकरणी पोलिसांनी नौशाद शाह आणि अली सय्यद या दोघांना अटक केली आहे. न्यायालयाने आरोपींना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. याप्रकरणी बीकेसी पोलीस अधिक तपास करत आहेत. पोलिसांकडून या दोन्ही आरोपींची कसून चौकशी सुरु आहे. या बनावट नोटा तयार झाल्यानंतर कुठे वितरीत केल्या जात होत्या? या सगळ्यामागे कोणाचा हात आहे? याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. (Mumbai Crime)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community