Mumbai Crime : मोठी बातमी…! कॅश व्हॅनमध्ये सापडल्या ६५०० किलो चांदीच्या विटा

107
Mumbai Crime : मोठी बातमी…! कॅश व्हॅनमध्ये सापडल्या ६५०० किलो चांदीच्या विटा
Mumbai Crime : मोठी बातमी…! कॅश व्हॅनमध्ये सापडल्या ६५०० किलो चांदीच्या विटा
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचार सभांची जोरदार तयारी सुरू आहे. येत्या २० नोव्हेंबर रोजी मतदान होणार असून, २३ नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. तत्पूर्वी राज्यभर आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची करडी नजर आहे. सर्वत्र नाकाबंदी असून भरारी पथक गाड्यांची कसून तपासणी करत आहेत. याच दरम्यान, मुंबई उपनगरातील विक्रोळी भागात एका कॅश व्हॅनमध्ये (Cash van) साडेसहा टन चांदीच्या विटा (Silver bricks) सापडल्या आहेत. विकोळी पोलिसांनी (Vikhroli Police) व निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाने पकडलेल्या या विटा एकूण साडेसहा टन इतक्या आहेत. करोडोंच्या घरात यांची किंमत आहे. सध्या निवडणूक आयोग (Election Commission), इन्कम टॅक्स, पोलीस याचा अधिक तपास करत आहेत.    (Mumbai Crime)  

विधानसभेच्या रणधुमाळीत पैशाचा बाजार
मिळालेल्या माहितीनुसार, निवडणुकीमुळे अनेक ठिकाणी लावलेल्या पोलीस बंदोबस्तात करोडो रूपयांची माया पकडली जावू लागली आहे. दरम्यान या चांदीच्या विटा मुलुंडमधील एका गोदामामध्ये ब्रिंक्स या कंपनीच्या गाडीतून घेऊन जात होते. 
(हेही वाचा – मिसेस इंडिया गॅलेक्सी Rinima Borah देखील Love Jihad ची ठरलेली बळी; जबरदस्तीने धर्मांतर, गोमांस खायला दिले, मारहाणही केली)

या पूर्वी ही मुंबईत सापडली होती रक्कम

मुंबईत यापूर्वीही भुलेश्वरमध्ये देखील 1 कोटी 32 लाख रुपयांचा मुद्देमाल सापडला होता. याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना ताब्यात घेतलं होतं. याचाही तपास पोलिसांनी सुरु केला होता. शिवाय पुण्यात देखील दोन ठिकाणी पोलिसांनी मोठं घबाड जप्त केलं होतं.  पुण्यात रोकड नेण्यासाठी आरोपींकडून कारचा वापर करण्यात आला होता. आता मुंबईतील भुलेश्वर प्रकरणात पाच लोक संशयितरित्या बॅग घेऊन जात होते. भुलेश्वरसारख्या वर्दळीच्या ठिकाणाहून लोक कुठे जात होते. ही रक्कम कोणाची आहे, याचा तपास करण्यासाठी पोलिसांनी या पाचही जणांना पोलीस ठाण्यात आणण्यात होतं. याबरोबरच या प्रकरणात आयकर विभागाला पाचारण करण्यात आलं आहे.

हेही वाचा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.