Mumbai Crime Branch : मुंबईत बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, ५ पिस्तुलांसह चौघाना अटक

मुंबई गुन्हे शाखेने मागील ४८ तासात ५ पिस्तुलसह ४ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे.

219
Mumbai Crime Branch : मुंबईत बेकायदेशीर शस्त्र बागळणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, ५ पिस्तुलसह चौघाना अटक
Mumbai Crime Branch : मुंबईत बेकायदेशीर शस्त्र बागळणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, ५ पिस्तुलसह चौघाना अटक

मुंबई शहरासह उपनगरात मुंबईत गुन्हे शाखेकडून (Mumbai Crime Branch) बेकायदेशीर शस्त्र बाळगणारे त्याचबरोबर सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. मागील ४८ तासांत मुंबई गुन्हे शाखेने (Mumbai Crime Branch) ५ पिस्तुलसह ४ जणांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेले सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. गुन्हे शाखेकडून सुरू असलेली कारवाई आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) पार्श्वभूमीवर सुरू आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या (LokSabha Elections) पार्श्वभूमीवर मुंबई गुन्हे शाखेकडून (Mumbai Crime Branch) मुंबईसह उपनगरात गुन्हेगार, तसेच बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यावर कारवाई करण्यात येत आहे. मागील ४८ तासांत गुन्हे शाखेकडून वेगवेगळ्या परिसरातुन ४ जणांना शस्त्रासह अटक करण्यात आली आहे.

(हेही वाचा- Nitesh Rane : संजय राऊत यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करून त्यांची चौकशी व्हावी; नितेश राणे यांची मागणी )

युनिट ९ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने सांताक्रूझ पश्चिम सोमपुरी मार्केट (Mumbai Crime Branch) येथून समीर विजय मेघनानी (४९) याला अटक केली आहे. मेघनानी याच्या अंगझडती गुन्हे शाखेने देशी बनावटीची स्टीलची दोन पिस्तुल आणि १० जिवंत काडतुसे जप्त केली. (Mumbai Crime Branch) मेघनानी हा बेकायदेशीररित्या पिस्तुल (Illegal weapon) विक्रीसाठी घेऊन आला होता. समीर हा पालघर जिल्ह्यातील नायगाव येथे राहणारा आहे. दरम्यान युनिट ३चे प्रभारी पोलीस निरीक्षक दीपक सुर्वे यांच्या पथकाने वरळी आणि नागपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतून दोन सराईत गुंडांना अटक केली आहे. वरळी येथून अटक करण्यात आलेला शाम तांबे हा छोटा राजन टोळीचा शार्पशूटर आहे. तर दुसरा गुन्हेगारी अभिलेख असलेला फारूक शेख याला पिस्तुल विक्री प्रकरणी मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानक परिसरातुन अटक करण्यात आली आहे. त्याच्या अंगझडतीमध्ये एक देशी बनावटीचे पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे पोलिसांना सापडली. मूळचा उत्तर प्रदेशमधील लखनऊ चौक येथील रहिवासी असलेला आरोपी फारूक शेख हा कामाठीपुऱ्यातील १४ वी लेन परिसरात वास्तव्यास आहे. त्याच्या विरोधात नागपाडा पोलीस ठाण्यात दुखापत आणि मारामारीचे अनेक गुन्हे नोंद आहेत. (Mumbai Crime Branch)

युनिट ६ चे प्रभारी पोलीस निरीक्षक रवींद्र साळुंखे यांनी आचार्य गार्डन, चेंबूर परिसरातून हुनमंत प्रताप पांडे याला अटक केली आहे. त्याच्याजवळुन गुन्हे शाखेने ३२ बोअरचे कॉल्ट कोब्रा कंपनीचे रिव्हॉल्वर जप्त केले आहे. पांडे यांच्याकडे उत्तर प्रदेश येथील रिव्हॉल्वरचा परवाना मिळून आला असला तरी हा परवाना रद्द झालेला असून पांडे हा कुर्ला पश्चिम येथे राहणारा असून तो स्वतः जवळील रिव्हॉल्वर तासी भाड्याने देत होता. हे रिव्हॉल्वर तो भाड्याने कुणाला देत होता, भाड्याने घेणारे त्याचा वापर कशाकरिता करीत होते याचा तपास सुरू आहे. (Mumbai Crime Branch)

हेही पहा- 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.